महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बर्निंग बसचा थरार! धावत्या बसने अचानक घेतला पेट; पुणे-बंगळुरू महामार्गावरील थरारक घटना - KOLHAPUR BURNING BUS

पुणे-बंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ शुक्रवारी मध्यरात्री एका खासगी बसला आग लागली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Private Bus fire broke out on Pune Bengaluru Highway near Gokul Shirgaon Kolhapur
पुणे-बंगळुरु महामार्गावर बसला आग (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2024, 12:19 PM IST

Updated : Oct 26, 2024, 12:31 PM IST

कोल्हापूर : बेळगावहून पुण्याला निघालेल्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव ते उजळाईवाडीदरम्यान शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास हा 'बर्निंग बस'चा थरार घडला. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं? : खासगी कंपनीची प्रवासी बस बेळगावहून रात्री नऊ वाजेच्या सुमारास निघाली होती. सुमारे 30 प्रवासी असलेली ही बस गोकुळ शिरगाव येथील मयूर पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर अचानक इंजिननं पेट घेतला. इंजिनला आग लागल्याचं पाहताच चालक आणि वाहकानं घटनास्थळावरुन पलायन केलं. बसमधील प्रवासी गडबडीनं खाली उतरले. मात्र, एक प्रवासी झोपेत असल्यानं तो बसमध्येच अडकला. त्यामुळं आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला. काही वेळातच संपूर्ण बसनं पेट घेतला. बघता बघता आगीनं रौद्ररुप धारण केलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह गोकुळ शिरगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केलं. कोल्हापूर मनपाच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळं राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती.

पुणे-बंगळुरु महामार्गावर बसला आग (ETV Bharat Reporter)

बस चालक आणि वाहक पसार : इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे दिगंबर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यात. तर सध्या पोलीस चालक आणि वाहकाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा -

  1. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 'बर्निंग बसचा थरार'; 36 प्रवासी बालंबाल बचावले, पाहा व्हिडिओ - Burning Bus
  2. मेळघाटात एसटी बस पेटली ; अग्निशमन दलाची गाडी पाण्याविना पोहोचली घटनास्थळी, बसचा झाला कोळसा - ST Bus Burnt In Fire
  3. बसच्या चाकाखाली दुचाकी घासत गेल्यानं उडाल्या ठिणग्या, एसटीनं घेतला पेट, दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू - Pune Bangalore Highway Accident
Last Updated : Oct 26, 2024, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details