महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाय प्रोफाइल सोसायटीमधील कुंटणखानाप्रकरणी 'या' राजकीय नेत्याला अटक - Nashik Crime News - NASHIK CRIME NEWS

Nashik Crime News : शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील एका इमारतीतील घरात एका महिलेने कुंटणखाना सुरु ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघककीस आला. याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली. तर कुंटणखाना चालवणाऱ्या संशयित महिलेसह एका दलालास पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणी एका राजकीय नेत्याला अटक केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

Pawan Kshirsagar Arrested
पवन क्षीरसागर यांना अटक (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 10:04 PM IST

Updated : Sep 8, 2024, 10:22 PM IST

नाशिक Nashik Crime News : नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील उच्चभ्रू वस्तीमधील कुंटणखाना एका राजकीय नेत्याचा असल्याचं पोलीस तपासात समोर आला आहे. एक संशयित महिला एका राजकीय नेत्याच्या मदतीने हा कुंटणखाना चालवत होती. पवन क्षीरसागर संशयिताचं नाव आहे. ते एका राजकीय संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी त्यांना अटक केली.



काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वरनगर येथील एका उच्चभ्रू असणाऱ्या नक्षत्र सोसायटीत एका महिलेने कुंटणखाना सुरू केला होता. याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून दोन पीडित मुलीची सुटका केली होती. यात एक महिला आणि एका दलालाला पोलिसांनी अटक केली होती. ही महिला सोसायटीमधील इतर सदस्यांना दमदाटी करत होती. त्यांची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर मध्यवर्ती गुन्हे पोलिस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून याची खात्री करत कारवाई केली. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली होती. यात कुंटणखाना चालवणारी कविता साळवे-पाटील आणि तिच्या साथीदार जाफर मन्सुरीला अटक करण्यात आली होती.


कोण आहे पवन क्षीरसागर : संशयित कविता साळवे ही महिला आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर यांच्यासोबत भागीदारीमध्ये कुंटणखाना चालवत होती. पोलिसांनी क्षीरसागर यांना अटक करत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


सोसायटीमध्ये त्रास होता : नक्षत्र सोसायटीमध्ये सदस्य सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यापासून संशयित कविता साळवे या महिलेच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या पुरुष आणि महिलांची संख्या जास्त होती. आशात त्याच्या घरातून नेहमी शिवीगाळ, आरडाओरडा करणे असे आवाज येत असल्यानं सोसायटीमधील इतर सदस्य त्रस्त झाले होते. याबाबत आम्ही सगळ्यांनी साळवे यांना विचारणा केली असता, त्या उलट आम्हालाच दमदाटी करत होत्या. आता पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आम्हाला न्याय मिळाल्याचे सोसायटीमधील सदस्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. व्यावसायिकाला रात्रभर डांबून घेतली लाच; सीबीआयनं जीएसटी अधीक्षकासह तिघांना ठोकल्या बेड्या - CBI Arrested CGST Superintendent
  2. स्टॉक ट्रेडिंग घोटाळ्यात वृद्धला 13.26 कोटींचा चुना, तीघांना अटक - Cyber ​​fraud
  3. शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक, 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - shivaji maharaj statue collapse
Last Updated : Sep 8, 2024, 10:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details