ETV Bharat / state

संतोष देशमुख हत्याकांडात कोणाचीही गय केली जाणार नाही, सीआयडीला पूर्ण मोकळीक : देवेंद्र फडणवीस - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणालाही सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Santosh Deshmukh Murder Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2024, 5:39 PM IST

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी जनतेतून तीव्र भावना उमटत आहेत. मंगळवारी पुण्यात खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यानं सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. तर दुसरीकडं मुंबईत आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. दरम्यान, "या प्रकरणात कुणाची गय केली जाणार नाही. दोषीवर कडक कारवाई केली जाईल, अशा प्रकारे कुणाचीही हिंसा करता येणार नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

सीआयडीला पूर्ण अधिकार : "या प्रकरणाचा छडा लागत नाही आणि आरोपींना आम्ही शोधत नाही. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. यातील आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील. अशा प्रकारच्या सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच 302 गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता, "कुठला गुन्हा दाखल करायचा? कोणते कलम लागणार आहे? याबाबत पोलीस निर्णय घेतील. पोलीस ब्रीफिंग करतील... जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आली आहे. सीआयडीला पूर्ण स्वायत्तता दिली आहे. पूर्ण अधिकार दिले आहेत. सीआयडीवर कोणाचाही दबाव नसणार किंवा सीआयडीवर कोणाचाही दबाव खपवून घेतला जाणार नाही," असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देणारच : आपल्यावर सूड भावनेनं कारवाई होत आहे, असं वाल्मिक कराड यानं म्हटलंय. असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, "कोण काय म्हणतंय... यापेक्षा पोलिसाकडं जे पुरावे आहेत, त्या पुराव्याच्या आधारावर कारवाई करण्यात येणार आहे. कुणालाही सोडणार नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यायची ही आमची भूमिका आहे. तो आम्ही न्याय मिळवून देणारच. आता कोण याच्यात राजकारण आणत असेल, तर त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो. पण मी याच्यात काही राजकीय हेतूचं समर्थन करणार नाही आणि विरोधी करणार नाहीत. पण जर कोण याच्यात राजकारण आणत असेल, तर त्याचा त्यांना फायदा होणार नाही. जर कुणाकडं काही पुरावे असतील, तर ते पुरावे पोलिसांना सादर करावे. पुराव्याच्या आधारावर चौकशी करण्यात येईल. कारवाई करण्यात येईल. पण मी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणारच," असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. अखेर वाल्मीक कराडची शरणागती: सीआयडी अधिकारी कराडला घेऊन केजकडं रवाना
  2. सर्व आरोपींची सर्व संपत्ती जप्त करावी, अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल-आमदार सुरेश धस
  3. बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.