मुंबई : 2024 या वर्षातील आज 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. आज मुंबईसह जगभरात इयर एंडिंग मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केलं जाते. दरम्यान आज वर्षातील शेवटच्या दिवशी शेवटच्या सूर्यास्ताला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी मरीन ड्राइववर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नागरिकांनी अत्यंत भावनिक होत वर्षातील शेवटच्या सुर्यास्ताला निरोप दिला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमृत सुतार यांनी.
मरीन ड्राइववर मुंबईकरांची गर्दी : दरम्यान, आज जगभरात मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जात आहे. मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी मुंबईकर जमत सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान मुंबईतील मरीन ड्राईव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकर गर्दी करतात. आज वर्षातील शेवटच्या दिवशी शेवटच्या सूर्यास्ताला निरोप देण्यासाठी आणि सूर्यास्ताचे फोटो मोबाईलमध्ये घेण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी मरीन ड्राईव्ह इथं मोठी गर्दी केली. "आम्ही प्रत्येक वर्षी मरीन ड्राइववर सनसेट पाहण्यासाठी येतो आणि इथं इयर एंडिंग सेलिब्रेशन करतो" असं इथं आलेल्या मुंबईकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा :