छत्रपती संभाजीनगर Police Beat Delivery Boy :आजकाल ऑनलाईन खरेदी करण्याचा कल वाढला आहे. मागवलेली वस्तू घरी येणार म्हणून अनेकांना वाट पाहावी लागते. त्यासाठी डिलिव्हरी बॉयला बरेच फोन करुन वारंवार विचारणा केली जाते. त्यात कधीकधी वाद देखील उद्भवतात. असाच एक प्रकार शहरातील सिडको भागात घडला. मागवलेली वस्तू लवकर देण्यासाठी सारखे फोन केल्यानं झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी संबंधित मारहाण करणाऱ्या पोलिसावर सिडको पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसानंच डिलीव्हरी बॉयला केली बेदम मारहाण; वरिष्ठांनी केलं निलंबित - Police Beat Delivery Boy - POLICE BEAT DELIVERY BOY
Police Beat Delivery Boy : पार्सलची डिलीव्हरी करण्यास उशीर केल्याबद्दल एका डिलीव्हरी बॉयला पोलीस कर्मचाऱ्यानं काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणाच्या पाठीवर आणि ओठावर गंभीर जखमा झाल्या आहेत. अविष्कार कॉलनीत सोमवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे.
Published : Aug 21, 2024, 5:04 PM IST
डिलीव्हरी बॉयला पोलिसानं दिला चोप :छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फ्लिपकार्टवर मागवलेली वस्तू देण्यास उशीर झाल्यानं डिलीव्हरी बॉयला एका पोलिसानं बेदम मारहाण केली. संभाजीनगरच्या सिडको पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या जीवन शेजवळ या पोलीस कर्मचाऱ्यानं ही मारहाण केली आहे. काठी तुटेपर्यंत या पोलीस कर्मचाऱ्यानं मारहाण केल्याचा आरोप डिलिव्हरी बॉयनं केलाय. जीवन शेजवळ यांनी एक वस्तू फ्लिपकार्टवरुन मागवली होती. ती वस्तू सोमवारी मिळेल, असा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता. त्यावरुन त्यानं डिलीव्हरी बॉयचं काम करणाऱ्या जितेंद्र नावाच्या युवकाला फोन लावून वस्तू लवकर आणून दे, असं सांगितलं. त्यावर आज खूप वस्तू आहेत, त्यामुळं थोडा वेळ लागेल, पण मी आणून देतो, असं उत्तर डिलीव्हरी बॉयनं दिलं. त्यावर जीवन शेजवळ यांनी जितेंद्रला वारंवार फोन केला. त्यामुळं फोनवरच दोघांचा वाद झाला. आलेली वस्तू देण्यासाठी जेव्हा जितेंद्र पोलीस शिपायाच्या घराजवळ गेला, त्यावेळी त्याला रस्त्यातच गाठून पोलीस शिपाई जीवन शेजवळ यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. गुन्हेगारांपासून सर्वसामान्यांचं संरक्षण करण्यासाठी देण्यात आलेल्या काठीनच या युवकाला मारहाण करण्यात आली. त्यात जितेंद्र याच्या डोक्याला, पाठीला तसंच पायाला जबर मार लागला.
गुन्हा दाखल, निलंबनाची कारवाई :सदरील घटना सोमवारी झाल्यानंतर मंगळवारी युवकानं सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. दरम्यान, या सर्व प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलिसांनी घेतली आहे. सदरील कर्मचारी 19 तारखेपासून सुट्टीवर होता. त्यानं वस्तू मागवली त्यातून वाद झाला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचारी जीवन शेजवळ याला निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनीत कांवत यांनी दिली.