महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्मशानातील भोंदू बाबाच्या जादूटोण्याचा डाव गावकऱ्यांनी उधळला; भोंदू बाबाला ठोकल्या पोलिसांनी बेड्या - Bhondu Baba Arrested - BHONDU BABA ARRESTED

Bhondu Baba Arrested : अंधश्रद्धेच्या नावानं करणीतून पैसे उकळल्याची घटना ठाण्यात घडली आहे. महिलेला भूत बाधा आणि करणीची भिती दाखवून हजारो रुपयांचा गंडा घातल्याची (Financial Fraud) घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Thane Crime News
भोंदू बाबाला ठोकल्या पोलिसांनी बेड्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 11:01 PM IST

ठाणे Bhondu Baba Arrested :अंधश्रद्धेच्या नावानं करणीतून पैसे उकळल्याच्या घटना सरासपणे घडत असतानाच, अशाच प्रकारे टिटवाळ्यातील एका भोंदू बाबानं ठाण्यातील एका महिलेसह ६ ते ८ जणांना भूत बाधा आणि करणीची भिती दाखवून हजारो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

भोंदू बाबावर गुन्हा दाखल: सदरील घटना भिवंडी तालुक्यातील पडघ्यानजीक असलेल्या एका गावातील स्मशानात घडलीय. याप्रकरणी भोंदू बाबावर पडघा पोलिस ठाण्यात (Padgha Police Station) विविध कालमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या सतर्कतामुळं स्मशानातील भोंदू बाबाच्या जादू टोण्याचा डाव उधळला असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. सुनिल चौबे भगत (बाबा) असं अटक भोंदू बाबाचं नाव असून तो टिटवाळा परिसरात राहतो.


काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ठाणे पश्चिममधील किसननगर भागात राहतात. त्यांची मुलगी ही 2017 पासून कौटुंबिक वादामुळं माहेरी राहते या दरम्यान मुलीला वारंवार चक्कर येवुन ती आजारीच राहत असल्यां तिच्यावर दवा-उपचार करुन देखील तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं तक्रारदारने तिच्या परिचयाचे टिटवाळा येथील आरोपी सुनिल चौबे भगत (बाबा) याच्याकडं मुलीला ठेवलं. त्यावेळी आरोपी भोंदू बाबाने डोळे बंद करुन मुलीबद्दल काही अचूक माहिती सांगितल्यानं तक्रारदारचा भोंदू बाबावर विश्वास बसला. त्यानंतर आरोपी बाबाने तक्रारदारकडून दक्षिणा म्हणून नारळ, हार आणि १०० रुपये रक्कम घेऊन एका कागदी पुडीमध्ये हळद देवुन ती अंघोळीच्या पाण्यात टाकुन मुलीला अंघोळ करण्यास सांगितलं. करणी बाधा उतरवण्यासाठी पुढील ८ वेळा टिटवाळा येथे त्यांचे दरबारास बोलवलं.


उतारा उतरविण्याकरिता मागितले ५ हजार :८ व्या वेळीस आरोपी बाबाने मुलीवरील करणी उतरवायची असल्यास स्मशानात जाऊन उतारा करावयाचे सांगून त्यासाठी ५ हजार रुपये खर्च सांगितला. त्यानंतर २० एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तक्रारदारला फोन करून रात्री मुलीला स्मशानात जाऊन तिच्यावरील करणी उतरवण्यासाठी ज्या व्यक्तिपासुन त्रास आहे, त्या व्यक्तिच्या फोटोसह रात्री साडे दहाच्या सुमारास टिटवाळा येथील दरबारात बोलवलं. त्यानंतर तक्रारदारने तिच्या मुलगीसह, मुलगा, सुन यांच्यासोबत रात्री १०.२० वाजताचे सुमारास कारने भोंदू बाबाच्या घरी पोहचले. त्यानंतर मुलीला बाबाने घरी थांबण्यास सांगुन उतारा उतरविण्याकरिता दक्षिणा ५ हजार रुपये तक्रारदार कडून घेतले.

भोंदू बाबाचा डाव उधळला : स्म्शानात विधी करताना भोंदू बाबानं अंगावर काळ्या रंगाचे कापड परिधान केले होते. यासह मंत्र बोलते वेळी विधी ठिकाणी मांडणी केलेल्या लिंबुला टाचण्या टोचुन ठेवल्या होत्या. बाबांचा विधी सुरु असतानाच त्या ठिकाणी गावातील १० ते १२ गावकऱ्यांनी स्मशानातील भोंदू बाबाच्या जादू टोण्याचा डाव उधळल्यानं सर्वांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळं या फसवणूक प्रकरणी फिर्यादीवरून २१ एप्रिल रोजी पडघा पोलिस ठाण्यात भोंदू बाबा सुनील चौबेच्या विरोधात जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या आधारे भोंदू बाबाचा पोलिस पथकानं शोध घेऊन त्याला अटक केल्याची माहिती, तपासी अमंलदार पोलीस नाईक सोनावणे यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा जदुटोणा विषयी अंधश्रद्धेचं पितळ उघडं पडलं असून याबाबत विविध माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक असल्याचं दिसून येत आहे.


हेही वाचा -

  1. POCSO प्रकरणातील आरोपी महंत शिवमूर्ती यांना आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Murugha Mutt Case
  2. मुलानंच दिली आई-वडिलांच्या हत्येची सुपारी; आठ आरोपींना अटक - Karnataka Gadag Murder Case
  3. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदाराकडून ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या घराची रेकी; कोलकाता पोलिसांनी केली अटक - Kolkata Police Arrested Mumbai Man

ABOUT THE AUTHOR

...view details