नाशिक Wrestler Killed In Nashik : कुस्तीपटू तरुणाची भर रस्त्यात कोयत्यानं वार करुन आणि बंदुकीतून गोळ्या झाडत खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव इथं शुक्रवारी घडली. भूषण लहामगे असं खून करण्यात आलेल्या कुस्तीपटूचं नाव आहे. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे (Reporter) अगोदर कोयत्यानं वार मग झाडल्या गोळ्या :नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर सांजेगाव येथील रस्त्यात निर्मल आश्रमासमोर कुस्तीपटूची हत्या करण्यात आली. भूषण लहामगे या कुस्तीपटूची कोयत्यानं वार करत त्यानंतर चार गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. भूषण हा जिल्हास्तरीय कुस्तीपटू असून त्याच्या खुनानं परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर अज्ञात मारेकरी फरार झाले असून, वाडीवरे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला असून हत्या कोणी केली याची अद्याप माहिती मिळून आली नाही. पोलिसांनी मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू केला आहे.
कोण आहे भूषण लहामगे :भूषण लहामगे हा इगतपुरी तालुक्यात कुस्तीपटू म्हणून सुप्रसिद्ध होता. तो शेती तसेच दुधाचा व्यवसाय करत होता. म्हशींसाठी चक्कीतले पीठ घेऊन तो आपल्या गावी सांजेगाव इथं निघाला होता. नाशिकमध्ये काही बाजार करुन आणि शहरातील सिडको येथील चक्कीतून म्हशींना पीठ घेऊन तो दुचाकीनं जात होता. त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या संशयितांनी त्याचा रस्ता अडवून त्याची हत्या केली. भूषणनं जिल्हा, विभाग स्तरावर कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिकं मिळवले होते. उत्तर महाराष्ट्र केसरी असलेल्या भूषण लहामगे याची निर्घृण हत्या झाल्यानं परिसरात दहशत पसरली आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
- विचारवंतांना असलेला धोका अजून संपलेला नाही, तिन्ही आरोपींच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात जाणार-हमीद दाभोलकर - Narendra Dabholkar Case Verdict
- मराठा आरक्षणासाठी मुलानं केली आत्महत्या अन् बापाचं खरं बिंग फुटलं - Son Murder Case
- पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; दोन चिमुरड्या मुलींनाही संपवलं - Wife Suicide Case