केपटाऊन SA vs PAK 2nd Test Day 3 Live : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स इथं 03 जानेवारीपासून सुरु आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे.
⚪️🟢 Day 2 comes to a close with Pakistan on 64-3 and they trail by 551 runs.
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 4, 2025
Kagiso Rabada got the breakthrough in the first over and struck on either side of a Marco Jansen wicket. We pick it up tomorrow at 10:30.#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/B17ya9ZGjn
पाकिस्तानची खराब सुरुवात : सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्ताननं 21 षटकांत 3 गडी गमावून 64 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून बाबर आझम नाबाद 31 आणि मोहम्मद रिझवान 9 धावांवर नाबाद आहेत. याशिवाय कर्णधार शान मसूद 2 धावा करुन बाद झाला तर कामरान गुलाम 12 धावा करुन बाद झाला. गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानं आतापर्यंत 2 आणि मार्को जॅनसेननं 1 बळी घेतला आहे. आजचा तिसरा दिवस पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा असेल.
There was more to that century by Kyle Verreynne 😁
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 4, 2025
Congratulations are in order for reaching the 1000 Test runs mark. Wishing you many many more! 🏏#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/lbSs3QWUBg
दक्षिण आफ्रिकेनं उभारला धावांचा हिमालय : तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी 141.3 षटकांत 615 धावांवर बाद झाला. यजमान संघाकडून रायन रिकेल्टननं द्विशतक झळकावलं. रायन रिकेल्टननं 259 धावांची विक्रमी खेळी केली. याशिवाय कर्णधार टेम्बा बावुमानं 106 आणि काइल वेरेनेनं 100 धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद अब्बास आणि सलमान आघा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मीर हमजा आणि खुर्रम शहजादनंही 2-2 विकेट घेतल्या.
आफ्रिकेच्या भूमिवर पाकिस्तानची खराब कामगिरी : दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानचा विक्रम तितकासा प्रभावी ठरला नाही. त्यांनी आफ्रिकेत आतापर्यंत 15 कसोटी सामने खेळले आहेत, त्यांनी फक्त 2 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दोन्ही बॉक्सिंग-डे कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी 2007 मध्ये शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
A dominant batting display from the Proteas saw three remarkable knocks 🏏#WTC25 | #SAvPAK 📝: https://t.co/IVj8WpMsHq pic.twitter.com/dsol0CCmwX
— ICC (@ICC) January 4, 2025
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 29 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खूपच प्रभावी ठरली आहे. या 29 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेनं 16, तर पाकिस्ताननं केवळ 6 सामने जिंकले आहेत. 7 सामने अनिर्णित राहिले. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतं की, कसोटी प्रकारात दक्षिण आफ्रिकेचं पाकिस्तानवर वर्चस्व आहे. यासह देशांतर्गत परिस्थितीचा फायदा दक्षिण आफ्रिकेला आणखी मजबूत बनवतो.
WTC फायनलमध्ये पोहोचणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ : जर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलबद्दल बोललो तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. एका दिवसापूर्वीच दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव करुन WTC च्या अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यांची लढत आता ऑस्ट्रलियाशी होणार आहे. सिडनी इथं झालेल्या कसोटी सामन्यात कांगारुंनी भारताचा 6 विकेटनं पराभव करत अंतिम फेरीत स्थान पक्क केलंय. त्यामुळं या सामन्याचा निकालाचा आता WTC गुणतालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही.
Proteas quicks provide late breakthroughs to put the hosts in a commanding position against Pakistan 👊#WTC25 | #SAvPAK 📝: https://t.co/AUvsQcdxg8 pic.twitter.com/T8RmYTTEQA
— ICC (@ICC) January 4, 2025
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा कधी सुरु होईल?
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रविवार, 5 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता न्यूलँड्स, केपटाऊन इथं सुरु होईल.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ कुठं आणि कसा पाहायचा?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 एसडी आणि स्पोर्ट्स 18-1 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. तसंच या सामन्याची जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
A maiden double century in Tests for Ryan Rickelton as the Proteas pile on the runs in Cape Town 💥#WTC25 | 📝 #SAvPAK: https://t.co/AUvsQcdxg8 pic.twitter.com/pa7lFdJNi4
— ICC (@ICC) January 4, 2025
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेने (यष्टिरक्षक), मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना म्फाका.
पाकिस्तान : शान मसूद (कर्णधार), सईम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान आगा, आमेर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास
हेही वाचा :