महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चामुंडा एक्स्प्लोझिव्ह कंपनी स्फोट प्रकरण, मृतकांच्या कुटुंबीयांना 35 लाखांच्या मदतीची गडकरींची घोषणा - Chamunda blast case - CHAMUNDA BLAST CASE

Chamunda blast case : चामुण्डा एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतक कामगारांच्या कुटुंबीयांना 35 लाखांच्या मदतीची घोषणा केली.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 7:53 PM IST

नागपूरChamunda Blast Case :काल नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील धमणा येथील चामुंडा कंपनीत स्फोट झाला होता. या स्फोटात 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून 3 कर्मचारी जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन यांनी घटनास्थळाला भेट देत सर्व परिस्थिती जाणून घेतली.

भीषण स्फोटात 6 जण मृत्यूमुखी : भीषण स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या 6 कामगारांच्या कुटुंबाची नितीन गडकरी यांनी विचारपूस केली असून मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. अपघाताबाबत माहिती जाणून घेताना नितीन गडकरी यांनी अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, खासदार श्याम बर्वे, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.

मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश :काल चामुंडा एक्सप्लोसिव्ही कंपनीत झालेल्या स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू झाला असून तीन कामगार रुग्णालयामध्ये जगण्यासाठी संघर्ष करत आहे. आज धामणा येथे मृतदेह आणण्यात आले. त्यावेळी मृतकांच्या कुटुंबियांचा आक्रोश बघून गावातील सर्व नागरिकांचे डोळे पाणावले.

अपघाताला जबाबदार कोण :या दुर्दैवी घटनेत मृतकांची संख्या सहा झाली आहे. अकुशल कामगारांच्या हाती 500 किलो स्फोटके देणे, काम सुरू असताना एकही वरिष्ठ उपस्थित नसणे, स्फोटक असलेल्या ठिकाणी काळजी न घेणे, सुरक्षा पोशाख, सेफ्टी शूज अशी कोणतेही सुरक्षा साधनं कामगारांना कंपनीनं उपलब्ध करून दिलेली नव्हती. त्यामुळं आज सहा कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गडकरींनी केलं सांत्वन :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज चामुंडी एक्सप्लोझिव कंपनीतील स्फोटामध्ये जीव गमावणाऱ्या मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. दुर्दैवी घटनेमुळं कुटुंबीयांवर कोसळलेलं संकट अत्यंत वेदनादायी असल्याचं ते म्हणाले. गडकरी यांनी फॅक्टरीत आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्याच्या यंत्रणेबाबत विचारणा केली. भविष्यात अशाप्रकारची घटना घडू नये, यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. गावकऱ्यांसोबत देखील नितीन गडकरी यांनी संवाद साधला.

मृत, जखमींना मदत देण्याची मागणी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख अपघातातील जखमींना चांगले उपचार देण्याची मागणी केलीय. ज्यावेळी मंत्री नितीन गडकरी घटनास्थळी आले, त्यावेळी देखील अनिल देशमुख यांनी त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारनं किमान 25 लाख तसंच कंपनीकडून 50 लाख रुपये मदत देण्याची त्यांनी मागणी केली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे? हा प्रश्न चामुंडी दुर्घटनेमुळं निर्माण होत आहे. गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप कामगारांचा जीव गेला. डोंबिवली एमआयडीत दर आठवड्या स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येतात. या घटनेकडं सरकार, प्रशासकीय यंत्रणा गांभीर्यानं लक्ष देत नाही. सतत होणारे अपघात मानवी चूक नसून याला सरकार तसंच प्रशासन दोषी असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चामुंडी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाची तसंच संबंधित कंपनी व्यवस्थापनाची मदत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.

मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश :चामुंडा स्फोटक कंपनीत झालेल्या स्फोटात 6 कामगारांनी आपला जीव गमवलाय. त्यामध्ये 5 महिलांचा समावेश आहे. प्रांजली किसन मोदरे, वैशाली आनंद क्षीरसागर, प्राची श्रीकांत फलके, शीतल आशिष चटप, मोनाली शंकरराव अलोने अशी पाच महिलांची नावं आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व महिला 20 ते 25 वयोगटातील महिला आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 49 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश भारतीय असण्याची भीती - Kuwait Building Fire
  2. बलात्कार पीडितेची आत्महत्या: गावातीलच नराधमानं अत्याचार केल्याच्या धक्क्यातून पीडितेनं घेतलं जाळून - Rape Victim Dies By Suicide
  3. विधानपरिषद निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाचा शिवसेनेवर दबाव? - Legislative Council Elections

ABOUT THE AUTHOR

...view details