महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NEET पेपर लिक प्रकरण; मुख्याध्यापकाला पोलीस कोठडी, तर शिक्षकाला ठोकल्या बेड्या, NEET प्रकरणात लातूर कनेक्शन - NEET Exam Paper Leak Case - NEET EXAM PAPER LEAK CASE

NEET Exam Paper Leak Case : NEET पेपर लिक प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकानं लातूरच्या दोन शिक्षकांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील मुख्याध्यापक असलेल्या जलील खान उमरखान पठाण याला न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

NEET Exam Paper Leak Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 8:18 AM IST

लातूर NEET Exam Paper Leak Case :देशभर गाजत असलेल्या NEET पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन पुढं आलं आहे. लातूरच्या दोन शिक्षकांचा NEET पेपर लिक प्रकरणात सहभाग असल्याचं आढळून आल्यानं दहशतवाद विरोधी पथकानं एका जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. तर फरार असलेल्या शिक्षकाला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी रविवारी रात्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जलील खान उमरखान पठाण याला अटक केली. तर फरार असलेल्या संजय जाधव या शिक्षकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही शिक्षक खासगी कोचिंग सेंटर चालवत असल्याची प्राथमिक माहिती पुढं आली आहे.

दहशतवाद विरोधी पथकानं ठोकल्या बेड्या :देशभरात NEET पेपर लिक घोटाळ्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय टेस्टींग एजन्सीनं NEET च्या 1564 विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करुन ती पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत. NEET परीक्षेचा पेपर लिक झाल्यानं या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लातूरच्या दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं आढळून आल्यानं दहशतवाद विरोधी पथकानं त्यांना बेड्या ठोकल्या. यातील जलील खान उमरखान पठाण हा जिल्हा परिषदेच्या शाळेचा मुख्याध्यापक आहे, तर संजय जाधव हा शिक्षक आहे. हे दोन्ही शिक्षक खासगी कोचिंग सेंटर चालवत असल्याची माहिती प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाला चार जणांचा आढळला सहभाग :NEET पेपर लिक प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाला चार जणांचा सहभाग आढळून आला. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकानं या चार जणांचा शोध सुरू केला. यातील जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक जलील खान उमरखान पठाण, शिक्षक संजय जाधव, नांदेड इथल्या इराण्णा मशनाजी कोंगलवार आणि दिल्लीतील गंगाधर यांच्याविरुद्ध सार्वजनिक परीक्षा कायदा, 2024 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.

मुख्याध्यापकाला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी :जिल्हा परिषदेतील शिक्षकांचा NEET पेपर लिक प्रकरणात सहभाग असल्याची टीप दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरुन काही संशयित NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पैशाच्या मोबदल्यात परीक्षा पास करण्यासाठी बेकायदेशीर रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केल्याचं लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात अटक केलेल्या मुख्याध्यापक जलील खान उमरखान पठाण याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. तर शिक्षक संजय जाधव याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं, असंही पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं. या आरोपींनी दिल्लीतील गंगाधर याच्या केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशिल पोलिसांच्या हाती लागल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा, एसआयटी चौकशी होणार - NEET Paper Leak Case
  2. NEET पेपर लीकचा 6 राज्यांशी संबंध, सीबीआयची कारवाई, कोण आहे मास्टरमाइंड? जाणून घ्या A टू Z माहिती - NEET Paper Leak Connection
  3. NEET-UG पेपर लीक प्रकरणात नवीन गुन्हा दाखल, CBI तपासासाठी पाटणा, गोध्राला जाणार - NEET UG Paper Leak Case

ABOUT THE AUTHOR

...view details