महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नक्षल नेत्यानं 28 वर्षांच्या हिंसक प्रवासाला दिला पूर्णविराम; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात - Giridhar With Wife Surrender

Giridhar With Wife Surrender : गडचिरोली जिल्ह्याचा सूत्रधार नांगसू मनसू तुमरेटी उर्फ गिरीधर बिच्चू आणि त्याची पत्नी संगिता उर्फ ललिता चैतू उसेंडी या दोघांनीही शनिवारी (22 जून) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण केलंय. त्यांनी 28 वर्षांच्या हिंसक प्रवासाला पूर्णविराम दिला. हाती संविधान घेऊन त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केलीय.

Naxal leader Giridhar With Wife Surrender
नक्षल्यांचा प्रमुख नेता गिरीधरचे फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 5:31 PM IST

गडचिरोली Giridhar With Wife Surrender: जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा जहाल नेता नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चू याने पत्नी समवेत शनिवारी (२२ जून) रोजी आत्मसमर्पण केलं. त्याच्यावर तब्बल 179 गुन्हे नोंद आहेत. नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चू याने आत्मसमर्पण केल्यानं माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

नक्षल्यांचा प्रमुख नेता गिरीधरचे फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण (ETV BHARAT Reporter)

माओवादी चळवळीला मोठा हादरा :दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी मर्दीनटोला चकमकीनंतर माओवाद्यांची मोठ्या प्रमाणात जीवित हाणी झाल्यामुळं उत्तर आणि दक्षिण विभागाचं विलीनीकरण होऊन संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीची जबाबदारी गिरीधरकडं सोपविण्यात आली होती. त्यामुळं गिरीधरच्या आत्मसमर्पणामुळं गडचिरोली आणि संपूर्ण मध्य भारतातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे.




इतक्या गुन्ह्यांचा समावेश: नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चू 1996 नक्षल दलम सदस्य म्हणून भरती झाला. 2021 पासून मर्दीनटोला अभियान आणि उत्तर- दक्षिण गडचिरोली विभागाच्या विलीनीकरणानंतर त्याने विभागीय समितीचे प्रभारी आणि सचिव म्हणून काम केलं. गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद्यांच्या संपूर्ण राजकीय व लष्करी हालचालींचा प्रभारी म्हणून काम केलं. त्याच्यावर आजपर्यंत एकूण 179 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 86 चकमक, 15 जाळपोळ इ. गुन्ह्यांचा समावेश आहे.


कोण आहे संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडी : सन 2006 मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडीची जून 2020 मध्ये माड एरीया मधून दक्षिण गडचिरोली एरीयामध्ये बदली झाली. भामरागड दलममध्ये डिव्हीसीएम पदावर त्या कार्यरत आहे. त्यांच्यावर आजपर्यंत एकूण 18 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 07 चकमक, 01 जाळपोळ, इ. गुन्ह्यांचा समावेश आहे.


राज्य शासनाकडून इतकं बक्षीस जाहिर : आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र आणि राज्य शासनाकडून नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चू याला एकुण 15 लाख रुपये बक्षीस जाहिर केलंय. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र आणि राज्य शासनाकडून संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडी हिला एकूण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केलंय. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडून पती-पत्नी असलेले नक्षल सदस्य यांना आत्मसमर्पण केल्यास, एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केलंय.



गृहमंत्र्यांनी संविधान हाती देत केला सत्कार: गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मसमर्पित नक्षल कुटुंबाचा मेळावा भरविण्यात आला होता. यात गिरीधर आणि त्याची पत्नी संगीताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य प्रवाहाचा मार्ग निवडला. यावेळी फडणवीस यांनी दोघांच्या हातात संविधानाची प्रत देत त्यांचा सत्कार केला. सोबतच त्यांना आत्मसमर्पण योजनेअंतर्गत शासनाकडून 15 आणि 8 लाख रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचं कौतुक केलंय.

हेही वाचा -

  1. लोकसभेतील पराभवानंतरही पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांची खेळी? - Pankaja Munde Rajya Sabha
  2. सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crime
  3. देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची सलामत, पण भाजपाला नंबर 1 सिद्ध करण्यासाठी मोठं आव्हान - Devendra Fadnavis

ABOUT THE AUTHOR

...view details