नाशिक Accident In Kasara Ghat: पावसाळ्यामुळे मुंबई-नाशिक मार्गावरील डोंगरावरून लहान धबधबे कोसळत आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांना धबधब्याचं दृश्य पाहण्याचा मोह आवरता येत नाही. परंतु धबधब्याजवळ उभं राहणं काही वाहनचालकांना महागात पडलं आहे. मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेलरचं वळणावर ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला धबधब्याजवळ असलेल्या 7 वाहनांना या ट्रेलरनं धडक दिली. अपघातातामधील जखामींवर कसारा इगतपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
.ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं दिली 7 वाहनांना धडक (Source- ETV Bharat) धबधब्याजवळ उभं राहणं नाडलं: गेला काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे डोंगरावरून लहान धबधबे कोसळत आहे. हे दृश्य बघण्यासाठी आणि आपल्या मोबाइलमध्ये शूटिंग करण्याकरिता अनेक वाहनचालक रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करून धबधबा पाहतात. मात्र, याचाच पर्यटकांना फटका बसला. धबधबा असलेल्या ठिकाणी धोकादायक वळण आहे. अनेकदा येथे गाड्यांचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडले आहेत. त्यामुळे तसे फलकदेखील रस्ते वाहतूक विभागाकडून येथे लावण्यात आले आहे. तरीसुद्धा काही वाहनचालक डोळे झाक करत या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला गाड्या उभ्या करतात.
- शनिवारी कोसळली दरड : अपघाता वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी कसारा घाटात दरड कोसळली होती. सुदैवाने यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरड कोसळल्याचा मेसेज हेल्पलाईनला मिळल्यावर रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी: पावसाळा सुरू झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील धबधबे आणि मनमोह दृश्यांची जिल्ह्यातील नव्हे तर इतर शहरातील पर्यटकांनासुद्धा भुरळ पडत असते. त्यामुळे पर्यटकांचा ओढ नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे असतो. धरण क्षेत्राच्या परिसरात आणि पर्यटनस्थळावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी व्हायला लागली आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये, याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील तब्बल 35 पर्यटनस्थळांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
काय आहे पर्यटकांसाठी नियम:पोलिसांच्या आदेशामुळे आता पर्यटनस्थळे आणि धरणावर पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येऊ शकणार नाहीत. पावसाळ्यामुळे वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, धबधब्याजवळ जाणे आणि पाण्याच्या प्रवाह खाली बसण्यास बंदी आहे. धोकादायक झालेले धबधबे तसच धोकादायक कठड्यांवर सेल्फी काढण्यास चित्रीकरण करण्यास तसेच नैसर्गिक धबधबांच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, उघड्यावर मद्य सेवन करण्यास मनाई आहे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर आणि इतरत्र फेकणे, महिलांची छेड काढणे तसेच डीजे सिस्टीम वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात सर्व चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा
- Beed Road Accident : धुळे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या मांजरसुंबा घाटात अपघात; महिलेचा जागीच मृत्यू
- मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात: भरधाव ट्रक दुभाजक तोडून कारवर आदळल्यानं कारमधील चार जण ठार - Accident On Mumbai Agra Highway