नागपूर Teacher Dance Ram Song : अयोध्येत रामललाच्या प्राण प्रतिष्ठेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा संपूर्ण देश रामभक्तीत तल्लीन होतोय. एकीकडे राम मंदिराला नववधूप्रमाणं सजवण्यात आलंय, तर दुसरीकडे 22 जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्याची देशभरातजय्यत तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीये.
शिक्षिकेचा रामाच्या गाण्यावर डान्स : सोशल मीडियावरही सध्या रामभक्तीच्या गाण्यांची धूम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आपल्या अकाऊंटवरून रामाचे अनेक गाणे शेअर करतात. या पार्श्वभूमीवर, आता नागपुरातील एका शाळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षिका रामाच्या गाण्यावर मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल : मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ नागपुरमधील एका शाळेचा आहे, जेथे ही शिक्षिका मुलांसोबत रामाच्या भजनांवर नाचताना दिसत आहे. ही शिक्षिका 'राम आयेंगे' आणि 'भारत का बच्चा-बच्चा जय श्री राम बोलेगा' या गाण्यांवर मुलांसोबत नाचते आहे. शिक्षिकेच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 90 हजार व्हूज मिळाले असून, 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्स 'जय श्री राम' अशा कमेंट देखील करत आहेत.
राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विधी होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलंय. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंगळवारपासून सहा दिवसीय विधी सुरू करण्यात आले होते.
हे वाचलंत का :
- राम जन्मभूमीचा वाद कोणामुळं सुरू झाला? वादग्रस्त जागेभोवती कुंपण कोणी अन् का लावलं?; जाणून घ्या A टू Z इतिहास
- 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- कपाळावर टिळा अन् हातात धनुष्यबाण! रामलल्लाची पूर्ण मूर्ती आली समोर