मुंबई : साऊथची सुपरस्टार लेडी नयनतारा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' डॉक्युमेंटरी आता सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली आहे. साउथ स्टार धनुषनं यापूर्वी नयनतारा, पती विघ्नेश शिवन आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स इंडियाला नोटीस पाठवून त्याच्या 'नानुम राउडी धन'मधील अनधिकृत फुटेज वापरल्याबद्दल 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. नयनतारा स्टारर 'चंद्रमुखी'च्या शिवाजी प्रॉडक्शन हाऊसनं 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये चित्रपटामधील फुटेज वापरल्याबद्दल तिच्याकडून 5 कोटी रुपयांची मागणी केली, असल्याचा दावा सोशल मीडियावर आता केला जात आहे.
शिवाजी प्रॉडक्शन हाऊसनं दिलं स्पष्टीकरण : फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी नयनताराला शिवाजी प्रॉडक्शननं जारी केलेली एनओसी एक्सवर शेअर केली आहे. यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, नयनतारानं तिच्या माहितीपटासाठी एनओसी मिळवली आहे. व्हायरल झालेल्या प्रमाणपत्राचा दावा आहे की, नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल'मधील फुटेज वापरण्यास शिवाजी प्रॉडक्शनचा कोणताही आक्षेप नाही. तसेच याप्रकरणी शिवाजी प्रॉडक्शन हाऊसनं स्पष्टीकरण दिलं की, 5 कोटी नुकसान भरपाईचा करण्याचा दावा हा खोटा आहे.
Chandramukhi team claiming ₹5⃣ cr compensation from Nayanthara netflix documentary is UNTRUE✖️ pic.twitter.com/FD7VfdCc4X
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 6, 2025
नयनताराचा माहितीपट : या पोस्टमध्ये असं लिहण्यात आलं आहे, 'आम्ही पुष्टी करतो की राउडी पिक्चर्सला 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या नेटफ्लिक्स माहितीपटासाठी फुटेज वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही घोषित करतो की, राउडी पिक्चर्सला कोणत्याही दाव्यापासून आणि प्रमाणपत्र अंतर्गत अधिकृत व्हिडिओ फुटेज वापरामुळे उद्भवलेल्या विवादापासून निरुपद्रवी ठेवू.' नयनतारानं तिचा माहितीपट हा राऊडी पिक्चर्सच्या बॅनरखाली बनवला आहे. या माहितीपटात नयनताराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगण्यात आलं आहे. 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' हा नोव्हेंबर 2024 पासून नेटफ्लिक्स इंडियावर स्ट्रीम होत आहे. शिवाजी प्रॉडक्शननं जारी केलेल्या एनओसीमध्ये एकाही पैशाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे डॉक्युमेंटरीमध्ये 'चंद्रमुखी'चे फुटेज वापरण्यासाठी राऊडी पिक्चर्सकडून 5 कोटी रुपयांची मागणी करण्याचा दावा हा खोटा आहे.
हेही वाचा :