महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पुन्हा हादरली ;भरधाव कारनं घेतला महिलेचा बळी, जमावानं कार चालकाला बेदम चोपलं - Mumbai Hit And Run

Mumbai Hit And Run : मेहंदी क्लासवरुन परतणाऱ्या महिलेला भरधाव कारनं धडक दिल्यानंतर फरफटत नेल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी मर्चंट नेव्हीमधील अनूज सिन्हा या आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Hit And Run
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 7:56 AM IST

मुंबई Mumbai Hit And Run : मालाडमध्ये भरधाव वेगातील कारच्या धडकेत 26 वर्षीय पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सहाना जावेद इक्बाल काझी (26) असं मृत महिलेचं नाव आहे. अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी कार चालक अनूज सिन्हा याला बेदम मारहाण करत त्याच्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन मालाड पोलिसांनी सिन्हाला बेड्या ठोकल्या आहेत.

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू :गुडिया पाडा मालाड इथं एका गाडीनं 26 वर्ष महिलेला धडक दिली आहे. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास एका Ford Endeavour या गाडीनं एका 26 वर्षीय महिलेला धडक दिली. या घटनेनंतर आरोपीनं जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपीला देखील अटक करण्यात आलं आहे. अटक आरोपीचं नाव अनुप सिन्हा (वय 45) असं असून मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करतो. मृत महिलेचं नाव सहाना काजी (वय 26) असून काजी या गृहिणी होत्या. त्या गुडिया पाडा परिसरात राहत होत्या. आरोपी विरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

मेहंदी क्लासवरुन परतताना भरधाव कारनं दिली धडक :दरम्यान याप्रकरणी मालाड पोलिसांनी गाडी जप्त केली आहे. संशयित आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलं असून आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही, याचा तपास सध्या मालाड पोलिसांकडून सुरू आहे. मालाडमधील ऑरिस टॉवर अपार्टमेंटमध्ये पती आणि दोन मुलांसोबत राहात असलेल्या सहाना या गेल्या काही दिवसांपासून मेहंदी शिकण्यासाठी जात होत्या. नेहमीप्रमाणं मंगळवारी रात्री त्या मेहंदी क्लासवरुन घरी परतत होत्या. यावेळी भरधाव वेगात जाणार्‍या कारनं त्यांना जोराची धडक दिली. धडकेनंतर सहाना या कारसोबत काही अंतर फरफटत गेल्या.

नागरिकांनी कारचालकाला बेदम चोपलं :भीषण अपघात घडल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी कारचा पाठलाग करुन चालक सिन्हा याला कारमधून उतरवत बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त जमावानं त्याच्या कारची तोडफोड केली. अपघाताची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील सहानाला उपचारांसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. स्थानिकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या सिन्हा यालाही पोलिसांनी रुग्णालयात नेत प्राथमिक उपचाराअंती त्याला अटक केली आहे. सिन्हा हा मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला असून अपघाताच्या वेळेस तो त्याच्या कारमधून घरी जात होता. आरोपी सिन्हा याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्यानं मद्यप्राशन केले होते का, हे रक्ताच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट, मिहीर शाहचा अल्कोहोल रिपोर्ट आला निगेटिव्ह - Worli hit and run case
  2. जळगाव 'हिट अँड रन'; भरधाव कारची महिला आणि बाईकला धडक, पाहा थरारक सीसीटीव्ही - Jalgaon Hit and Run Case CCTV
  3. मुंबईत पुन्हा हिट अँड रन! वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून जीप गेल्यानं एकाचा मृत्यू - Hit and run on Versova

ABOUT THE AUTHOR

...view details