मुंबई Mumbai Police Alert : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने कॉल करुन लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा हस्तक दादर स्टेशनवर येणार असून मोठी घटना घडवून आणणार असल्याची माहिती दिली. या कॉलनंतर मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलीस देखील अलर्ट मोडवर आले आहेत. मात्र मुंबई पोलिसांना शुक्रवारी उशिरा रात्री आलेल्या या कॉलबाबत मुंबई पोलीस तपास करत असून अज्ञात कॉलरचा शोध घेत आहेत.
अज्ञात व्यक्तीचा मुंबई पोलिसांना फोन : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि मुंबई पोलीस सतर्क झालेत. गेल्या चार महिन्यांमध्ये मुंबई पोलिसांना एकूण अज्ञात व्यक्तींचे 8 हॉक्स कॉल आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात पोलिसांना दोन धमकीचे मेल आले होते. शुक्रवारी उशिरा रात्री एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन सांगितलं की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येऊन मोठी घटना घडवून आणणार आहे. मुंबई पोलिसांनी दादर स्टेशनचा कॉलरनं उल्लेख केल्यामुळं जीआरपी आणि आरपीएफशी देखील संपर्क साधला आणि त्यांना अलर्ट केलंय.