मुंबई Central Railway Jumbo Mega Block : मध्य रेल्वे सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांवरील अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे सुरू झाल्याची घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे. ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कामाबाबत मध्य रेल्वेनं अपडेट शेअर केलेत.
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 5 आणि 6 च्या रुंदीकरणासाठी 63 तासांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आलाय. प्रवाशांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेता आणि एस्केलेटरची तरतूद आणि एफओबी पायऱ्यांचं रुंदीकरण यासारख्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी ही कामे महत्त्वपूर्ण आहेत. 1 जून रोजी, प्लॅटफॉर्म क्र. 5 वर आरसीसी बॉक्स प्लेसमेंट यशस्वीरित्या कार्यक्षम प्रगती दाखवून 04:05 तासांत पूर्ण झाले.
350 मजुरांचे 24 तास काम-05:10 तासांत मिलिटरी बोगी वेल टाईप (एमबीडब्लूटी) रेकवर पोकलेन एक्साव्हेटर आणि रोलरसह यंत्रसामग्री आणि साहित्य त्वरीत जमा केले . न्यू मुलुंड गुड्स स्टेशनवर उपकरणे वेळेवर पाठवल्यानं अखंड कार्यप्रवाह आणि किमान व्यत्यय सुनिश्चित होतो. विशेष म्हणजे, 05:50 तासात साहित्य भरून बीआरएन (बीआरएन) रेक आल्यानं प्रकल्पाची गती आणखी वाढली. तसंच वेळेवर काम पूर्ण होण्यासाठी अधिकारी आणि पर्यवेक्षकांसह 350 मजूर 24 तास काम करत आहेत.