मुंबई Lalit Tekchandani Arrested by EOW : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) मंगळवारी नऊ तासांच्या चौकशीनंतर बिल्डर ललित टेकचंदानीला अटक केलीय. शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि सुप्रीम कन्स्ट्रक्शन्सचे संचालक असलेल्या ललित टेकचंदानी याच्याशी संबंधित विविध ठिकाणी गेल्या शुक्रवारी केलेल्या छापेमारीनंतर ही अटक करण्यात आलीय. सध्या पाच गुन्ह्यांमध्ये अडकलेला टेकचंदानीविरुद्ध अलीकडेच चेंबूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक; अनेक मोठे मासे अडकणार? - सुप्रीम कन्स्ट्रक्शन्स
Lalit Tekchandani Arrested by EOW : मुंबईतील बिल्डर ललित टेकचंदानीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मंगळवारी रात्री अटक केलीय. त्याच्यावर 160 घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Published : Jan 31, 2024, 6:55 AM IST
टेकचंदानीच्या निवास्सथान आणि कार्यालयात छापेमारीत डिजीटल उपकरणं जप्त : हा तपास फसवणूक प्रकरणाचा असून या प्रकरणात तक्रारदारानं नवी मुंबईतील टेकचंदानीच्या तळोजा बांधकाम प्रकल्पात 36 लाखांची गुंतवणूक केली होती. प्रकल्पातील विलंबामुळं असंख्य गृह खरेदीदारांना मालमत्ता किंवा भरलेल्या पैशाचा परतावा मिळत नव्हता. चौकशी करुनही बिल्डरनं खोटी आश्वासनं दिली. त्यामुळं आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. आर्थिक गुन्हे शाखेनं चेंबूर, बीकेसी आणि टेकचंदानी याचं निवासस्थान आणि कार्यालयासह इतर ठिकाणी केलेल्या छापेमारी कारवाईदरम्यान डिजिटल उपकरणं जप्त केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त निशीत मिश्रा यांनी दिलीय.
आज न्यायालयात हजर करणार : आरोपी बिल्डरविरुद्धच्या एका एफआयआरमध्ये 160 घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या 160 जणांकडून त्यानं तब्बल 44 कोटी रुपये जमा केले. त्यांना फ्लॅट तसंच पैसेही परत केलेले नाही. अटक केलेल्या बिल्डरला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. बिल्डर ललित टेकचंदानी याचे अनेक राजकीय नेत्यांशीही संबंध आहेत. त्यामुळं यात आता कोणाकोणाचे नाव समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहाणार आहे.
हेही वाचा :