ETV Bharat / entertainment

शाहरुख खान नववर्षानिमित्त कुटुंबासह मक्का मदिनाला गेला होता?, व्हायरल फोटोंमागचं सत्य आलं समोर... - SHAH RUKH KHAN VIRAL PHOTO

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी शाहरुख खान कुटुंबासह मक्का मदिनाला गेला असल्याचा दावा सोशल मीडियावर होत आहे.

shah rukh khan
शाहरुख खान (shah rukh khan - instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 7, 2025, 12:17 PM IST

मुंबई : अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'किंग खान'नं 2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला होता. दरम्यान सोशल मीडियावर शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात शाहरुख हा आपल्या कुटुंबाबरोबर मक्का मदिना येथे दिसत आहे. आता 'किंग खान' खरच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मक्का मदिनाला गेला होता का ? असा सवाल, त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून करत आहेत. याशिवाय 'किंग खान'नं देखील मक्का मदिना येथील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत.

शाहरुख खान मक्का मदिनाला गेला ? : व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खानबरोबर असल्याचा दिसत आहे. फोटोत शाहरुख खान आणि आर्यन खान यांनी पांढरा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. दुसरीकडे गौरी खानबद्दल बोलायचं झालं तर तिनं ग्रे कलरच्या हिजाब घातला आहे. शाहरुखचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. आता या फोटो मागे एक सत्य दडलेलं आहे. शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचा हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं तयार केला गेला आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे शाहरुख खान हा अनेकदा डीपफेकचा बळी ठरत आहे. यापूर्वी देखील त्याचे असेच काही फोटो व्हायरल झाले होते.

डीपफेकचे 'हे' स्टार्सही बळी ठरले आहेत : शाहरुख खान याआधी रश्मिका मंदान्ना, काजोल, तमन्ना भाटिया आणि आलिया भट्ट हे स्टार्स देखील डीपफेकच्या शिकार झाले आहेत. एआयमुळे रश्मिका मंदान्नाला खूप त्रास सहन करावा लागला होता. मात्र तिनं डीपफेकप्रकरणी लढा दिला. यामध्ये तिला मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी देखील साथ दिली. आता एआयद्वारे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यामुळे अनेकांना या गोष्टीचा त्रास होत आहे. दरम्यान 'किंग खान'च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'पठाण 2', 'लॉयन' आणि 'जवान 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या चॅट लीकबद्दल केलं भाष्य, काय आहे प्रकरण जाणून घ्या...
  2. शाहरुखसह अनेक दिग्गजांचा आवाज असलेला 'मुफासा: द लायन किंग' का पाहावा? समजून घ्या ही कारणं
  3. सलमान, संजय दत्तसह शाहरुख खाननंही झिजवलाय पोलीस स्टेशनचा उंबरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.