मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा 2'ची कमाई बॉक्स ऑफिसवर मंदावली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एक महिना पूर्ण केला आहे. आता हा चित्रपट 1206 कोटींचा टप्पा पार करून भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा हिट ठरला आहे. रिलीजच्या 33व्या दिवशी अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली आहे. सॅकनिल्कनुसार, 'पुष्पा 2'नं सर्व भाषांमध्ये सोमवारी 6 जानेवारी रोजी 2.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या आठवड्यात कमाईत घसरण होऊनही, या चित्रपटाचे विक्रम मोडणे सुरूच आहे.
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'पुष्पा 2'नं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये, तिसऱ्या 129.5 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 33 दिवसांत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देशांतर्गत 1208.7 कोटी रुपये कमवले आहेत. 'पुष्पा 2'नं हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटानं हिंदी बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन 813.5 कोटीचं केलं आहे. 'पुष्पा 2'नं अवघ्या चार आठवड्यांत जागतिक स्तरावर 1800 कोटींची जबरदस्त कमाई करून 'बाहुबली 2'ला मागे टाकले आहे. 'बाहुबली 2' हा 2016 पासून जगभरात दुसरा सर्वाधिक कमाई करणार चित्रपट होता.
#Pushpa2TheRule is now Indian Cinema's INDUSTRY HIT with THE HIGHEST EVER COLLECTION FOR A MOVIE IN INDIA 🔥
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) January 6, 2025
The WILDFIRE BLOCKBUSTER crosses a gross of 1831 CRORES in 32 days worldwide 💥💥#HistoricIndustryHitPUSHPA2
Book your tickets now!
🎟️ https://t.co/tHogUVEOs1… pic.twitter.com/FExzrtICPh
#Pushpa2TheRule is now Indian Cinema's INDUSTRY HIT with THE HIGHEST EVER COLLECTION FOR A MOVIE IN INDIA 🔥
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) January 6, 2025
The WILDFIRE BLOCKBUSTER crosses a gross of 1831 CRORES in 32 days worldwide 💥💥#HistoricIndustryHitPUSHPA2
Book your tickets now!
🎟️ https://t.co/tHogUVEOs1… pic.twitter.com/FExzrtICPh
'पुष्पा 2' 'दंगल'चा विक्रम मोडणार ? : सोमवारी, निर्मात्यांनी 'पुष्पा 2'चा 32 दिवसांचा जगभरातील अहवाल सोशल मीडियावर शेअर केला. यावर त्यांनी कॅप्शनमध्ये माहिती देताना लिहिलं, 'पुष्पा 2 द रुल' आता भारतीय सिनेमाचा हिट चित्रपट बनला आहे, ज्याचे भारतातील आतापर्यंतचे सर्वाधिक कलेक्शन आहे. वाइल्डफायर ब्लॉकबस्टरनं 32 दिवसांत जगभरात 1831 कोटींचा आकडा पार केला आहे. आता या पोस्टवर अल्लू अर्जुनचे अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाचा विक्रम मोडणे बाकी इतर चित्रपटांना खूप कठिण असेल, कारण हा चित्रपट हळूहळू बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. 'पुष्पा 2' चित्रपट 'दंगल'चं 2,024 कोटीचा विक्रम तोडण्याचा मार्गावर आपली वाटचाल करत आहे.
हेही वाचा :