मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात घोषणा केली. यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले. यानंतर तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी मिळाला, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ते दोन-चार दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होताहेत. यामुळं महिला वर्गात आनंदाचं वातावरण असताना, आता या योजनेबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेतील अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, आता या योजनेला मुदतवाढ मिळाली आहे.
'या' तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेला महाराष्ट्रात उत्तम आणि उदंड प्रतिसाद मिळतोय. दिवाळीच्या आधीच ऑक्टोबर- नोव्हेंबर या दोन महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाल्यामुळं दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींनाृ भाऊबीजचं गिफ्ट मिळालं. तर अजूनही काही महिलांना कागदपत्रांच्या अडचणींमुळे या योजनेचे अर्ज दाखल करता आले नव्हते. परंतु अशा महिलांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर होता. मात्र, आता या योजनेमध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्यात करता येणार आहेत.
अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच :दुसरीकडे या योजनेमध्ये राज्य सरकारनं 46000 कोटीची तरतूद केली आहे. आत्तापर्यंत 24 हजार कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. मात्र जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्याचे एकूण 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. या योजनेमुळे गाव-खेड्यातील गोरगरीब महिलांना मोठा फायदा होत असल्याचं दिसून आलं. परंतु दुसरीकडे ज्या महिलांचे बँक खाते, आधार कार्ड आदी कागदपत्रं नव्हते, अशा महिलांना आता या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार. त्यांना आता वरील कागदपत्रं तयार करण्यासाठी अवधी मिळणार आहे. कारण, या योजनेसाठी सरकारनं 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेचे अर्ज करण्यासाठी दि. 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकनं दिली.
हेही वाचा
- नाशिकमधील आर्टिलरी सेंटरमध्ये सराव करताना स्फोट, दोन अग्निवीरांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
- बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या; 700 पोलिसांकडून तपास सुरू
- मंदिरासह सजली शिर्डी, साईबाबांच्या काकड आरतीनं पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ