प्रतिक्रिया देताना सह पोलीस आयुक्त लखमी गौतम मुंबई Gangster Prasad Pujari :शनिवारी सकाळी कुख्यात गुंड प्रसाद पुजारीला (वय 44) (Gangster Prasad Pujari) चीन देशातून प्रत्यार्पण करून मुंबईत आणण्यात आलं, त्यावेळी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. दुपारी त्याला कोर्टात हजर केलं असता मोक्का कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
प्रसाद पुजारीला अटक : विक्रोळी परिसरात राजकीय व्यक्ती आणि बिझनेसमन असलेल्या चंद्रकांत जाधव यांच्यावर प्रसाद पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. हा गोळीबार 19 डिसेंबर 2019 ला करण्यात आला होता. या प्रकरणी भारतीय दंड संविधान कलम 307 आणि 452 आदी कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रसाद पुजारीला अटक करण्यात आल्याची माहिती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिलीय.
चीनमध्ये चालवत होता मोबाईल ॲक्सेसरीज दुकान : प्रसाद पुजारी हा सुरुवातीला कुमार पिल्लाई गँगसाठी काम करत होता. नंतर काही दिवस त्यानं छोटा राजन गँगसाठी काम केलं. पण नंतर त्यानं स्वतःची गँग तयार केली. प्रसाद पुजारी विरोधात मुंबईत आठ गुन्हे दाखल आहेत. आठ गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे खंडणी विरोधी पथकाकडं दाखल आहेत, तर तीन गुन्हे कक्ष 7 कडं तपासासाठी दाखल करण्यात आले आहेत. 2006 पासून चीनमध्ये राहत असलेल्या प्रसाद पुजारीचे चीनमध्ये मोबाईल ॲक्सेसरीज दुकान असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता, अशीही माहिती समोर आलीय.
2002 मध्ये पुजारीला अटक झाली होती : प्रसाद पुजारीविरोधात खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणी उकळणे, गोळीबार अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार केसेसमध्ये पुजारी विरोधात मोक्का लावण्यात आलेला आहे. 2005 पर्यंत पुजारीवर मुंबई, नवी मुंबईत अनेक लोकांना विशेषतः राजकीय नेते, बिझनेसमन, बॉलिवूडमधील मंडळी आणि बिल्डर्स यांच्याकडून खंडणी उकळल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर 2002 मध्ये प्रसाद पुजारीला अटक देखील करण्यात आली होती.
प्रसाद पुजारीविरोधात मोक्का कायदा : 2005 मध्ये प्रसाद पुजारी भारत सोडून निघून गेला. सुरुवातीला तो हाँगकाँग आणि नंतर चीनमध्ये राहत होता. त्याच्याविरुद्ध मुंबईत आठ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सहा गुन्ह्यांचा खटला सुरू आहे. एका गुन्ह्यांमध्ये त्याच्या साथीदारांना शिक्षा झाली होती. त्या गुन्ह्यात पुजारी वाँटेड होता. एप्रिल 2023 मध्ये पूर्वीच्या गुन्ह्यातील तक्रारदाराला धमकावून तक्रार मागे घेण्यास सांगण्यात आलं होतं. याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात शेवटचा एप्रिल 2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा देखील खंडणी विरोधी पथकाकडं तपासाधीन आहे. प्रसाद पुजारी विरोधात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. चार गुन्हांमध्ये पुजारी विरोधात मोक्का कायदा लावण्यात आलाय. 2012 मध्ये गुन्हे शाखेनं पुजारी विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती.
हेही वाचा -
- पोलिसांच्या हातावर तुरी देत ससूनमधून आरोपी फरार, गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकवल्या प्रकरणी होता अटकेत
- गुंडांसोबत फोटो व्हायरल झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर; घेतला 'हा' मोठा निर्णय
- संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुंडांबरोबरचा आणखी एक फोटो पोस्ट; म्हणाले 'पैचान कौन?'