मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं 15 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर (MNS Candidate List) केली. याआधी मनसेनं चार याद्या जाहीर केल्या होत्या. त्यानंतर शनिवारी 15 उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. याआधी जाहीर (MNS Releases 15 Candidates List) केलेल्या अनेक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले आहेत.
आतापर्यंत ७८ जणांना उमेदवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या पाचव्या यादीत १५ जणांची नावं जाहीर करण्यात आली असून, आतापर्यंत ७८ जणांना उमेदवारी देण्यात आली.
निवडणुकीची मनसेकडून जोरदार तयारी :मनसेनं यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. या वेळी २०० ते २२५ जागा लढणार आहोत, असं त्यांनी जाहीर केलं होतं.
मनसेच्या 15 उमेदवारांची यादी जाहीर
पनवेल - योगश जनार्दन चिले
खामगांव - शिवशंकर लगर
अक्कलकोट - मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य - नागेश पासकंटी
जळगाव जमोद - अमित देशमुख
मेहकर - भय्यासाहेब पाटील