ETV Bharat / bharat

दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? संभाव्य उमेदवारांबद्दल जाणून घ्या सर्वकाही - DELHI CM FACE NAME LIST

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजणार आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोण आहे? वाचा, संपूर्ण माहिती

delhi elections 2025 know which leader of aap congress and bjp is in race for CM face
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2025, 12:40 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासाठी अनेक नावांवर चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षानं सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर, अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री घोषित केलंय. केजरीवाल यांच्यापुढे कायदेशीर अडचणी असल्यानं आतिशी यांचंही नाव पुढं आलं आहे. दुसरीकडं भाजपानं 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी मुख्यमंत्री पदासाठी माजी खासदार बांसुरी स्वराज आणि मनोज तिवारी यांच्या नावांची चर्चा आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव आणि नवी दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार संदीप दीक्षित हेही स्पर्धेत आहेत.

आप, काँग्रेस आणि भाजपाची रणनीती : काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पक्षानं दिल्ली निवडणुकीसाठी आपापली रणनीती तयार केली आहे. आम आदमी पक्षातील केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं विचारपूर्वक रणनीती आखली आहे. काँग्रेसनं दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना नवी दिल्लीच्या जागेवर केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवारी दिली. त्याचबरोबर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र माजी खासदार प्रवेश वर्मा यांना भाजपानं तिकीट दिलंय. दोन्ही नेत्यांनी निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनं पक्षाचे ज्येष्ठ नेते फरहाद सूरी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं आतापर्यंत 48 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

आतिशी मुख्यमंत्री झाल्यामुळं कालकाजी ही जागा हायप्रोफाईल जागा ठरली आहे. त्यामुळं काँग्रेसनं चांदणी चौक मतदारसंघातून आमदार असलेल्या अलका लांबा यांना कालकाजी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर भाजपानं आतिशी यांच्या विरोधात तुघलकाबाद मतदारसंघातून तीन वेळा आमदार आणि दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले रमेश विधुरी यांना उमेदवारी दिली आहे. तर नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार केजरीवाल यांच्या विरोधात भाजपानं माजी खासदार प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

संभाव्य उमेदवार

भाजपाची 'ही' नावं चर्चेत : बांसुरी स्वराज या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांच्या त्या कन्या आहेत. तर बांसुरी स्वराजही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता आहे. भाजपाचे माजी खासदार आणि नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवार असलेले प्रवेश वर्मा हे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असू शकतात. दिल्लीतून खासदार म्हणून मनोज तिवारी हे चर्चेतील चेहरा आहेत. त्यामुळं पक्ष त्यांचाही पर्याय म्हणून विचार करू शकतो.

काँग्रेसमधील 'ही' नावं चर्चेत : काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील चेहऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर अलका लांबा, देवेंद्र यादव, संदीप दीक्षित ही नावं या पदासाठी शर्यतीत आहेत. अलका लांबा या पक्षात राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार आहेत. संदीप दीक्षित यांच्याबद्दल सांगायचं तर, जर ते नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले तर ते पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असू शकतात. दिल्लीत सलग तीनवेळा सत्तेवर असलेले संदीप दीक्षित हे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत.

केजरीवाल आणि आतिशी : सर्वपक्षीय नेत्यांमध्येही अरविंद केजरीवाल हे आपमधून मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्याच्या अटीमुळे त्यांना दिल्ली सचिवालय आणि मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाला तिसऱ्यांदा बहुमत मिळाल्यास आतिशी मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणुकीत आप स्वबळावर लढणार, अरविंद केजरीवाल 'हाता'विना घेणार 'झाडू'
  2. भाजपा लोकशाहीच्या मुळावर उठलेला पक्ष; अरविंद केजरीवालांना देशद्रोही ठरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, संजय राऊतांचा हल्लाबोल
  3. अरविंद केजरीवाल यांची करोलबागेत 'पदयात्रा'; राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था भाजपानं बिघडवल्याचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.