छत्रपती संभाजीनगर MLA Rohit Pawar on ED : "माझ्यावर एकच कारवाई बाकी आहे, ती म्हणजे अटकेची, त्यामुळं मला अटक होण्याची शक्यता आहे. काहीही केलं तरी मी घाबरणार नाही," असं सूचक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय. ते आज छत्रपती संभाजीनगरात बोलत होते. मी त्यांच्या सोबत जाईन असं वाटत असेल, मी लोकसभेत प्रचार करु नये असं त्यांना वाटतं. मात्र माझा लढा पुढे सुरू राहणार असल्याचा इशाराही आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही, दिल्लीपुढं मराठी माणूस झुकला नाही आणि झुकणार पण नाही, असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलय.
आजोबांसोबत राहीन :यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, "लोकांना वाटत होत आम्ही येणार नाही, मात्र मी कोणाला घाबरत नाही. काय करायचं ते करा. तुमच्या कुटुंबावर संकट आलं तर त्यांना सोडून जाणार का? आपली संस्कृती कशी आहे. हा नातू आपल्या अजोबला सोडून जाणार नाही, सोबत राहणार. महापुरुषांचा आदर्श समोर आहे. ज्यांनी थोर व्यक्तीचा अवमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. सत्तेसाठी जाता, का गेलात आम्हाला माहीत आहे. स्वतःच्या हितासाठी जायचं का? तर नाही. मग मी जाणार नाही. मागच्या महिन्यात मला ईडी ने बोलावलं. मी गेलो कागदपत्रं दाखवली, त्यांनी विचारलं ते सांगितलं. कन्नड मधील करखान्याबाबत मी माहिती देऊनही लोकसभा निवडणुकीच्या आधी नोटीस दिली. त्यांना वाटतं की मी त्यांच्या सोबत जावं, प्रचारासाठी फिरू नये. मात्र तसं होणार नाही. त्यामुळे एकच कारवाई राहिली ती म्हणजे अटकेची. पुढील काही दिवसांमध्ये मला अटक होऊ शकते. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी मी घाबरणार नाही. मी दिल्ली समोर झुकणार नाही, मी मराठी माणूस आहे. मला अटक झाली तरी हा लढा तुम्ही पुढे सुरू ठेवा. सगळ्यांचा आवाज दाबला जाईल. आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस विरोधात उभे राहिलेत. ज्यांनी त्रास दिला त्यांना आम्ही सोडणार नाही. लोकशाहीची ताकद वापरू. त्याने तुम्ही सहज सत्तेत जाऊ शकता."