अहमदनगर : प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर इंग्रजांनी विल्सन अर्थात भंडारदरा धरणाची 1926 साली निर्मिती अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि शेंडी गावाच्यामध्ये केली. भंडारदरा परिसरात अनेक नयनरम्य स्थळे आहेत. हे एक निसर्गसौंदर्यानं नटलेलं स्थान असून अनेक धबधबे डोंगर-कडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
भंडारदराची शान अम्ब्रेला फॉल! पाहा धबधब्याचे मन मोहून टाकणारे दृश्य - Umbrella Falls - UMBRELLA FALLS
अहमदनगर : जिल्ह्यातील भंडारदरा धरण अर्थात विल्सन डॅमचं नाव घेतलं की पर्यटकांच्या नजरेसमोर येतो तो भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ असलेला एका मोठा गोलाकार धबधबा. त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला अम्ब्रेला फॉल म्हणून ओळखलं जातं. तोच अम्ब्रेला फॉल आता बरसायला लागला आहे. चला तर पाहुयात या 'अम्ब्रेला फॉल'ची मन मोहून टाकणारी दृश्यं.
![भंडारदराची शान अम्ब्रेला फॉल! पाहा धबधब्याचे मन मोहून टाकणारे दृश्य - Umbrella Falls Umbrella Falls](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/28-08-2024/1200-675-22315277-667-22315277-1724829657725.jpg)
Published : Aug 28, 2024, 12:54 PM IST
|Updated : Aug 28, 2024, 1:47 PM IST
इंग्रजांनी सन 1910 साली या धरणाचं बांधकाम सुरू केलं होतं. साधारणतः 10 वर्षांचा कालावधी नंतर 1926 साली काम पूर्ण झालं. धरण परिसरात सरासरी वार्षिक 3220 मिलिमीटर पाऊस पडतो. धरणाची उंची 507 मीटर असून रुंदी तळाशी 82.29 असून ओलिताखालील क्षेत्रफळ 57000 हेक्टर आहे. जलाशयाचं 15.54 किलोमीटर क्षेत्रफळ आहे. धरणाची 11 टीएमसी क्षमता आहे.
महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाण आहे. तसंच रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, विश्राम गड ( पट्टाकील्ला) हरिश्चंद्रगड यासारखे किल्ले आणि पर्यटन स्थळे अकोले तालुक्यात आहेत.