महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"17 पिढ्या जरी आल्या, तरी तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही", मनोज जरांगे यांचा महायुतीला इशारा - MANOJ JARANGE ON MAHAYUTI

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

MANOJ JARANGE ON MAHAYUTI
मनोज जरांगेंचा महायुतीला इशारा (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2024, 8:14 PM IST

Updated : Oct 15, 2024, 9:05 PM IST

जालना : राज्यातील विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार. निवडणूक जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला मोठा इशारा दिलाय. "सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही", असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

महायुतीला संपवायचं :निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनोज जरांगे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की,"मराठ्यांनी 100 टक्के मतदान करावं, एकही मतदान वाया जाता कमा नये. मतदानाच्या दिवशी घरी राहायचं नाही, मतदान करण्यासाठी जावं ,आता धुरा मराठ्यांच्या खांद्यावर आहे. आपल्याला महायुतीला संपवायचं आहे. लोकसभेला ताकद दाखवली त्यापेक्षा दुप्पट ताकद आता विधानसभेला दाखवायची आहे. महायुतीला आता संपवायचं आहे,"

मनोज जरांगे यांचा महायुतीला इशारा (Source - ETV Bharat Reporter)

फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात काम केलं : "राज्यात महायुतीचं सरकार होतं. मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या की नाही हे यांच्या हातात होतं. पण आता मतं द्यायची की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. तुम्हाला खुर्तीवर बसू द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुमच्या 17 पिढ्या जरी आल्या, तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही. सत्ता तुम्हाला मराठ्यांनी दिली होती, पण सत्तेचा गैरवापर करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊन काम केलं. मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे, या द्वेषानं देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले," असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

मराठ्यांनी जागं व्हावं : "मराठ्यांची पोरं श्रीमंत होण्यापासून सरकारनं रोखलं. आता यांचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. मराठ्यांनी स्वतःच्या लेकरांची अग्निपरीक्षा बघू नये, लेकरांच्या पाठीमागं उभे राहावं. 5 वर्ष बोंबलत बसण्यापेक्षा मराठ्यांकडे हीच खरी वेळ आहे. आता मराठ्यांनी जागं व्हावं," असं जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केलं.

जाणूनबुजून मराठ्यांचा अपमान :"महायुती सरकारनं जाणूनबुजून मराठ्यांचा अपमान केला. त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसींमध्ये 17 जातींचा समावेश केला. त्यामुलं आता तु्म्ही ठरवायचं आहे की, आता जात मोठी करायाची की, तुमचा आमदार मोठा करायचा आहे. तुमची लेकरं मेली तरी या सरकारला काही घेणं देणं नाहीय. मराठ्यांना आता मनात आणि मतात दोन्हीमध्येही परिवर्तन करावं लागणार", अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा

  1. विधानसभा निवडणुकीची घोषणा, पण राजकीय समीकरण बदलल्याने सर्वच राजकीय पक्षांची तारांबळ
  2. "एकाच टप्प्यात कार्यक्रम करणार…", निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांचा महायुतीला टोला
  3. आचारसंहिता काळात कोणकोणत्या कामांवर बंदी? नियमांचं उल्लंघन केल्यास शिक्षा काय? जाणून घ्या सर्व माहिती
Last Updated : Oct 15, 2024, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details