महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आंदोलन संपवण्यासाठी मला मारण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप - मनोज जरांगे

Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात कट रचल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तसंच मला जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मनोज जरांगे यानी केला आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 3:47 PM IST

Updated : Feb 25, 2024, 5:17 PM IST

मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद

मुंबईManoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठा समाजाचा प्रभाव संपवायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. "देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे. मला फडणवीसांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न होतेय," असं त्यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत म्हटलं आहे. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर जाणार असल्याचं बोललं जात आहे.

बारस्करांच्या आरोपामागं फडणवीस : “देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठा समाजाचा प्रभाव संपवायचा आहे. सगे-सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण करायचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीशिवाय राज्यात काहीही होऊ शकत नाही. फडणवीस यांनी मराठा समाजात फूट पाडा आणि राज्य करा, या राजकारणाचाही वापर केला आहे. अजय बारस्कर यांनी केलेल्या खोट्या आरोपामागे तेच सूत्रधार आहेत," असं जरांगे-पाटील म्हणाले.

माझा एन्काऊंटर करण्याचा डाव :गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलं जात आहेत. कीर्तनकार अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे हेकेखोर आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांनी बंद दाराआड बैठका घेतल्याचा आरोप बारस्कर यांनी केला. दरम्यान, या आरोपानंतर आता मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते मला सलाईनमध्ये विष टाकून मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याचा डाव आखत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. ते आज (25 फेब्रुवारी) अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीत बोलत होते.

हे वाचलंत का :

  1. असल्या भंगार लोकांवर बोलायचं नाही, मनोज जरांगे पाटील यांची बारस्कर महाराजांवर प्रतिक्रिया
  2. मराठा आंदोलकांनी केला रास्ता रोको, पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष
  3. मनोज जरांगे पाटलांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी योग्य : हरिभाऊ राठोड
Last Updated : Feb 25, 2024, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details