मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आवाहन करताना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Manoj Jarange Patil Appeal: "लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही किंवा आपला उमेदवारही दिला नाही. ही निवडणूक मराठा समाजाच्या हातात सोपवली आहे. त्यामुळे सगेसोयऱ्यांना विरोध करणाऱ्यांना पाडा. असं पाडा की पुढच्या तीन पिढ्यांना निवडणुकीला उभा राहता येऊ नये," असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं. काही ठिकाणी ओबीसी नेत्यांना मराठा समाजाचे लोक विरोध करत आहेत, असा आरोप केला जातोय. मात्र त्याबाबत माहिती नसून काहीजण सहानुभूती मिळवण्यासाठी नाटकही करू शकतात, अशी त्यांनी टीका केली.
ज्याला पाडायचं ते पाडा :"लोकसभा निवडणूक मराठा समाजाच्या हातात सोपवली आहे. मात्र काही लोक जर माझ्या नावाने मत मागत असतील तर ते साफ चुकीचं आहे. स्वतःच्या दोन मुलांसाठी करोडो मुलांचे नुकसान करू नका. येणाऱ्या काळात समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. "स्वतः निवडणूक जिंकण्यापेक्षा एखाद्याला पाडण्यातदेखील मोठा विजय आहे. मराठा समाजाने केलेल्या आंदोलनांमुळे आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभा घेण्यासाठी स्वतःला यावं लागते, हे या समाजाचं यश आहे," असंदेखील जरांगे पाटील यांनी सांगितलं.
ओबीसी नेत्यांना विरोध नाही, पण :ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी निवडणूक प्रचारात मराठा समाजानं गाडीवर हल्ला केल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, " घटनेबाबत मला माहिती नाही. मात्र समाजाने असं करू नये. लोकशाहीमध्ये सर्वांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर असं झालं तर ते चुकीचं आहे. काही ठिकाणी प्रसिद्धीसाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी असं केलं जाऊ शकतं. कोणत्याही ओबीसी नेत्याला मी विरोध केलेला नाही. परंतु एकाला मुळीच सोडणार नाही. त्यानं मराठा समाजाचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. येवल्याच्या त्या नेत्याला ( मंत्री छगन भुजबळ) यांना समाज कधीही माफ करणार नाही. त्यांच्यासोबत जे कोणी नेते किंवा लोक होते, त्यांच्या विरोधात आम्ही कधीही काहीही बोललेलो नाही. आमची भाषण शोधून काढा बघा. कोणत्याही नेत्यावर आपण टीका केलेली नाही. मात्र प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी काही लोक मराठा समाजावर घाला घालू शकतात, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
हेही वाचा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्स मैदानावर 29 एप्रिलला 'महाविजय संकल्प सभा', बारामतीसह तीन लोकसभेत महायुतीचं कमळ फुलणार का? - Lok Sabha Election 2024
- कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवन्ना अडचणीत एसआयटी स्थापण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांचे आदेश - Prajwal Revanna obscene video case
- महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी? आमदार मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगत विषय संपवला - MANISHA KAYANDE EXCLUSIVE INTERVIEW