महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सासू सासऱ्यानंच केला जावयाचा 'गेम'; धावत्या एस टी बसमध्येच केला खून, मृतदेह सोडला बस स्थानक परिसरात - Man Murder In Running ST Bus - MAN MURDER IN RUNNING ST BUS

Man Murder In Running ST Bus : धावत्या एस टी बसमध्ये जावयाचा खून करुन सासू सासऱ्यानं मृतदेह बस स्थानक परिसरात ठेवल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी सासू आणि सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीला आणि नातवांना दारू पिऊन त्रास देत असल्यानं सासू सासऱ्यानं जावयाचा काटा काढल्याचा प्रकार या घटनेवरुन उघड झाला आहे.

Man Murder In Running ST Bus
पकडण्यात आलेला सासरा (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 10:42 AM IST

Updated : Sep 27, 2024, 2:04 PM IST

कोल्हापूर Man Murder In Running ST Bus : दारूच्या नशेत पत्नी आणि नातेवाईकांना शिवीगाळ करून त्रास देणाऱ्या जावयाचा सासू सासऱ्यानंच चालत्या एस टी बसमध्ये गळा आवळून खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. जावयाचा खून केल्यानंतर मृतदेह एस टी बस स्थानक आवारात ठेवल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली. संदीप रामगोंडा शिरगांवे असं खून करण्यात आलेल्या जावयाचं नाव असन तो शिरोळ तालुक्यातील चिंचवाड गावचा आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अवघ्या काही तासात गुन्ह्याची उकल करत संशयित आरोपी सासू गौरा हनमंतआप्पा काळे ( वय 45 वर्षे) आणि सासरा हनमंतआप्पा यल्लाप्पा काळे ( वय 49 वर्षे रा. भडगांव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर ) या दोघांना अटक केली आहे.

मारेकरी सासू सासरे (Reporter)

बस स्थानकात बेवारस मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सी बी एस स्टॅन्ड परिसरात एक अज्ञात व्यक्ती बेवारस स्थितीत मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती एस टी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकाऱ्यानी तत्काळ सीबीएस स्टॅन्ड इथं घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी बेवारस स्थितीत असलेल्या व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं गळा आवळून ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मृत व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्या जवळील कागदपत्रावरून त्याचं नाव संदिप रामगोंडा शिरगांवे, असल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सी पी आर रूग्णालयात पाठवला.

सासू सासऱ्यानंच केला जावयाचा 'गेम'; धावत्या एस टी बसमध्येच केला खून (Reporter)

सासू सासऱ्यानं आणून ठेवला मृतदेह :घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी त्यांनी खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करण्यासाठी पथक नेमून तपासासाठी रवाना केले. दरम्यान मृतदेह मिळालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशी केली असता रात्रीच्या सुमारास अनोळखी एक महिला आणि एक पुरुषानं मृतदेह एस टी स्टॅन्ड परिसरातून उचलून आणून ठेवल्याचं निदर्शनास आलं. तर मृतदेहाजवळील कागदपत्रातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत संदीप रामगोंडा शिरगावे याच्या नातेवाईकांकडून पोलिसांनी माहिती घेतली. यावेळी संदीप शिरगावे हा दारु पिऊन त्रास देत असल्यानं त्याची पत्नी आणि मुलं त्याच्यापासून विभक्त गडहिंग्लजमध्ये राहत असल्याचं समजलं.

एस टी बसमध्येच दोरीनं गळा आवळून केला खून :या माहितीवरुन पोलिसांनी सासू गौरा हनमंतआप्पा काळे आणि सासरा हनमंतआप्पा यल्लाप्पा काळे या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता, मृत संदीप शिरगावे हा दारुचा व्यसनी असल्यानं तो पत्नी मुलांना नेहमी त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या पत्नीनं घटस्फोट घेवून लहान मुलासह ती गडहिंग्लज इथं मागील दोन वर्षापासून राहत होती. मात्र तरीही संदीप शिरगावे गडहिंग्लज इथं दारु पिऊन जावून पत्नी आणि मुलांना त्रास देत मारहाण करत असल्याचं सासू-सासर्‍यानं सांगितलं. दरम्यान तीन दिवसापासून संदीप शिरगावे हा गडहिंग्लज इथं जावून दारु पिऊन पत्नी, मुलास त्रास देवून मारहाण करत होता. म्हणून संशयित आरोपी असलेले सासू-सासऱ्यानं त्याला समजावून सांगत असतानाही तो ऐकत नसल्यानं त्यास रात्री उशिरा गडहिंग्लज इथून कोल्हापूर इथं एस टी बसमधून सोडण्यासाठी घेवून आले. मात्र संदिपनं चालू गाडीत पुन्हा भांडण्यास सुरूवात केली. त्यावेळी सासरा हनमंतआप्पा यल्लाप्पा काळे आणि सासू गौरा हनमंतआप्पा काळे यांनी संदीपचा दोरीनं गळा आवळून ठार मारलं. यानंतर मध्यरात्री एसटी कोल्हापूर स्थानकात येताच मृतदेह एस टी बसमधून खाली घेवून त्यास उचलून एस टी स्टॅन्ड आवारात ठेवल्याचं संशयितांनी सांगत गुन्हा केल्याची कबुली दिली. या घडलेल्या घटनेनंतर शाहुपूरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. शाळेच्या आवारात 6 वर्षाच्या चिमुकलीचा सापडला मृतदेह, मुख्याध्यापकाला अटक होताच धक्कादायक माहिती समोर - Gujarat School girl murder
  2. 29 वर्षीय तरूणीची हत्या, मृतदेहाचे 32 तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये - Bengaluru Girl Murder Case
  3. तृतीयपंथीयाचा गळा आवळून खून; लग्नाच्या तगाद्यामुळे मारेकऱ्यानं केला 'गेम', जाणून घ्या पोलिसांनी कसा लावला 6 तासात छडा - Transgender Murder In Satara
Last Updated : Sep 27, 2024, 2:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details