महाराष्ट्र

maharashtra

पठ्ठ्यानं पोस्टानं गुवाहाटीवरुन मागवलं चक्क हेरॉईन, क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट; पुढं काय घडलं? वाचा सविस्तर - Man Demands Heroin From Guwahati

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 11:55 AM IST

Man Demands Heroin From Guwahati : श्रीरामपूर शहरात थेट पोस्टानं हेरॉईन (अंमली पदार्थ) मागवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून एकास अटक केली.

Narcotics ordered by post in Shrirampur, one arrested
श्रीरामपूरमध्ये एकाने पोस्टाने मागवले 'हेरॉईन' (ETV Bharat Reporter)

श्रीरामपूर Narcotics Ordered By Post :भारतीय डाकसेवेद्वारे गुवाहाटी येथून श्रीरामपुरात अंमली पदार्थ (हेरॉईन) पार्सलने मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. श्रीरामपूर शहरातील पूर्णावादनगर येथील विक्रांत राऊत यानं हे पार्सल ऑनलाइन मागवल्याचं स्पष्ट झालं असून पोलिसांनी NDPS कलमानुसार गुन्हा दाखल करत आरोपीवर कारवाई केली आहे.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख (ETV Bharat Reporter)
नेमकं काय आहे प्रकरण? :गुवाहाटी इथून टपाल सेवेद्वारे एक पार्सल श्रीरामपूर डाक कार्यालयात येणार असून त्यामध्ये अंमली पदार्थ असण्याची शक्यता एनसीबी मुंबई कार्यलयानं वर्तवली होती. ही माहिती पार्सल नंबरसह अहमदनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस आणि एनसीबी पथकानं डाक विभागाशी संपर्क करुन वार्ड क्रमांक 7 मधील बीटवर असणाऱ्या महिला पोस्टमनला या कारवाईत सहभागी करुन घेत मोठ्या शिताफीन पार्सल मागणी करणाऱ्याला शोधून काढलं. त्यानंतर पार्सल ऑर्डर करणारा आरोपी विक्रांत राऊतला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यासंबंधी अधिक तपासणी करत असताना पोलिसांनी आरोपीचे ऑनलाइन नेटवर्क तपासलं असता, क्रिप्टोकरन्सीमध्ये पैशाची देवाण-घेवाण करुन संबंधीत अंमली पदार्थ ऑर्डर केल्याची माहिती समोर आली.


अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कुरीअर आणि पोस्टाच्या सेवेचा गैरफायदा केला जात असल्याची विधीमंडळ अधिवेशनात राज्य गृह विभागानं अगोदरच कबुली दिलीय. राज्यभर अंमली पदार्थाचं जाळ पसरलं असून आता नगर जिल्ह्यात देखील अशा पद्धतीनं परराज्यातून ड्रग्ज ऑर्डर केल्या जात असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. ऑनलाइन ड्रग्ज आणि सोशल मीडियामुळं अवघं जग हातात आल्यानं गुन्हेगारीकडं झुकणाऱ्या श्रीरामपुरात असे किती जण ड्रग्जच्या आहारी गेलेत आणि याचं लोन कसं पसरतंय हे तपासण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय.

हेही वाचा -

  1. निवडणुकीच्या रणधुमाळीत अमली पदार्थ विरोधी पथकाची 'मायानगरी'त मोठी कारवाई; 1 कोटी 34 लाखांचे ड्रग्ज जप्त, सात जणांना अटक - Drugs Seized
  2. ड्रग्ज मिळून आल्याची बतावणी करत डॉक्टर, उद्योजकाला 31 लाखांचा गंडा - Nashik Crime
  3. नागपूर विमानतळावर कस्टम्सकडून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक - Narcotics Case Nagpur

ABOUT THE AUTHOR

...view details