महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल माध्यमांवरील प्रेमातून लव्ह, प्यार और धोका; तरुणीवर बलात्कार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या - Girl Rape And Blackmail In Thane - GIRL RAPE AND BLACKMAIL IN THANE

Girl Rape And Blackmail In Thane : इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या नराधमानं लग्नाचं आमिष देऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यानंतर तिचा गर्भपात करुन तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे.

Girl Rape And Blackmail In Thane
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 9:01 AM IST

ठाणे Girl Rape And Blackmail In Thane : इवेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या 24 वर्षीय पीडित तरुणीच्या जीवनात लव्ह, प्यार और धोका या हिंदी चित्रपटासारखी घटना घडली आहे. या पीडितेची सोशल माध्यमांवर एका 22 वर्षीय तरुणासोबत ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून त्यानं पीडितेवर वारंवार बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केलं. दगाबाजावर कोनगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली. नुरीहान मोमीन असं अटक करण्यात आलेल्या दगाबाजाचं नाव आहे.

सोशल माध्यमावर झालेल्या ओळखीतून बलात्कार :पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी इवेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत असून ती कुटुंबासह उल्हासनगर कँम्प नंबर तीन भागात राहणारी आहे. तर आरोपी दगाबाज हा भिवंडी शहरातील बंगलापुरा भागात राहतो. त्यातच दोघांची सोशल माध्यमांवर ओळख होऊन मैत्री झाली. यादरम्यान जानेवारी 2022 मध्ये एका ढाब्यावर इवेंट मॅनेजमेंटचं काम करताना दोघांमध्ये प्रेमाचं सूत जुळलं. याचा फायदा घेऊन आरोपी दगाबाजानं नोव्हेंबर 2023 मध्ये बहाण्यानं पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलवून लग्नाचं आमिष दाखून तिच्यावर बलात्कार केला.

नाशिकमधील तरुणीशी केला साखरपुडा :पीडित तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून या भामट्यानं महिन्याभरात म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये आरोपी नाशिकमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी साखरपुडा केला. याबाबतची माहिती पीडितेला मिळाली. यामुळं पीडितेनं आरोपी दगाबाजाला लग्नाबद्दल विचारलं असता, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. माझ्या घरच्यांनी माझा साखरपूडा जबरदस्तीनं केला असं बोलून त्यानं पीडितेला शांत केलं.

बलात्कार करुन केला गर्भपात :नराधम हा 29 एप्रिल 2024 रोजी पीडितेच्या घरी तिला भेटायला आला. यावेळी तिनं त्याच्याकडं लग्नाचा तगादा लावला. मात्र त्यावेळी त्यानं पीडितेला लग्नास नकार देऊन आपल्या दोघांचे अश्लिल फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुला बदनाम करील, अशी धमकी दिली. यावेळी त्यानं पीडितेला मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार या नराधमानं तिच्याकडून काही रक्कमही उकळली. तसेच तिचा गर्भपातही केल्याचा आरोपही पीडितेनं केला. दरम्यान, तिच्या जीवनात घडलेल्या लव्ह, प्यार और धोका या घटनेनंतर तिनं कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचं कथन केलं. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ आरोपी नुरीहानवर भादंवि कलम 376 (2) (एन) 506 (2), 323 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक निशिकांत विश्वकर यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पाजली बियर अन् केला बलात्कार - Minor Girl Rape Case
  2. नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या तरुणीवर कारमध्ये बलात्कार, मारहाणही केल्याचा पीडितेचा आरोप - Mumbai Crime
  3. लग्नाचे आमिष दाखवून मावस बहिणीवर बलात्कार; तब्बल आठ वर्षानंतर मिळाला न्याय, भावाला १० वर्षांची शिक्षा - Sister Rape Case

ABOUT THE AUTHOR

...view details