छत्रपती संभाजीनगरBacchu Kadu News :सध्याच्या सरकारमध्ये चांगले दिवस राहीले नाहीत. दिव्यांगांसाठी शासनाचं कोणतंही धोरण नाही. तरुणांसाठी धोरण असलं, तरी अर्थसंकल्पात काहीच नाही, असा हल्लाबोल प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
सरकारचं लोकांसोबत जमलं नाहीत तर आम्ही महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारनं आमच्या मागण्या मान्य करून निर्णय घ्यावा, असं देखील कडू म्हणाले. "सरकारनं याबाबत कोणतीही निर्णय न घेतल्यास 5 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे. 22 सप्टेंबर रोजी थेट शिवाजी पार्कवर पुन्हा बैठक घेणार आहोत," असा इशारा बच्चू कडू यांनी जाहीर सभेत दिला. "दिव्यांग तसंच शेतकऱ्यांच्या मागणीसाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, आमच्या हातात वेगवेगळ्या रंगाचे झेंडे देऊन विभाजनाचे काम केलं जातंय," असा अप्रत्यक्ष इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
आमदार बच्चू कडू यांचं भाषण (Etv Bharat Reporter) आम्ही दोन पावलं मागं घेऊ : "आमच्या मागण्या सरकारनं तातडीनं मान्य करून त्यावर निर्णय घेतल्यास दोन पावलं मागं घेऊ. सरकारनं या मागण्यांचा विचार न केल्यास शेतकरी, अपंग, शेतमजूर, कष्टकरी आदींनासोबत घेऊन स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार करू," असा इशाराही आमदार कडू यांनी दिला. बच्चू कडूंना विविध 17 मागण्यांचं निवेदन आयुक्तांना दिलं आहेत.
काय आहेत बच्चू कडूंच्या मागण्या :
- सरकारनं स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
- शेतकरी कर्जमाफी करावी.
- कर्जाच्या व्याजात 50 टक्के सवलत द्यावी.
- कांदा निर्यातबंदीचे स्वतंत्र धोरण बनवावं.
- बागायतदारांसाठी विशेष पॅकेज द्यावे.
- बागायतदारांना विशेष पॅकेज द्यावं.
- शेतमजुरांसाठी वेगळी योजना, राज्यात स्वतंत्र अपंग विभाग असला, तरी अपंगांच्या मासिक वेतनात वाढ करावी. त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावं.
- प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ सुरू करावं.
- शहरी तसंच ग्रामीण घरकुल योजनेतील निधीचं समानीकरण करावं. बेघरांना घरं द्यावी.
- अर्धवेळ सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवावं. मुंबईतील राज्यपालांच्या बंगल्याचा लिलाव करण्यात यावा. हा पैसा योजनांसाठी वापरावा.
- मुंबईतील पारशी व्यापाऱ्यांनी बळकावलेल्या जमिनी शासनाच्या ताब्यात द्याव्यात.
मुसळधार पावसात कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग-यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आमदार कडू यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. यावेळी प्रहारचे आमदार राजकुमार पटेल, कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे अपंग संघटनेचे अध्यक्ष रामदास खोत अधिकारी उपस्थित होते. तसंच राज्याच्या विविध भागातून अपंग, शेतकरी, कामगारांनी मुसळधार पावसात निघालेल्या मोर्चात सहभाग घेतला.