महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"...तर तुमची झेड प्लस सुरक्षा काढण्यात येईल"- केंद्रावरील टीकेनंतर प्रसाद लाड यांचा शरद पवारांवर निशाणा - Sharad Pawar Z Plus Security

Prasad Lad On Sharad Pawar : माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांना केंद्र सरकारनं झेड प्लस सुरक्षा दिली आहे. मात्र, त्यांनी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे.

Sharad Pawar,, BJP MLA Prasad Lad
शरद पवार, प्रसाद लाड (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 9:31 PM IST

मुंबई :केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. या सुरक्षेवरून शरद पवारांनी, "ही सुरक्षा मला कशासाठी पुरवली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्या अनुषंगानं माहिती मिळवण्याची सरकारनं, अशी व्यवस्थित केलेली असावी," असा टोला केंद्र सरकारला लगावला होता. यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवलीय.

प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया (Etv Bharat MH Desk)
पवार साहेबांना शोभत नाही : भाजपा नेते प्रसाद लाड म्हणाले," केंद्र सरकारनं शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली. म्हणून विरोधी पक्षनेते तसंच शरद पवारांनी केंद्र सरकारचे आभार मानायला हेवेत. त्याऐवजी माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी ही सुरक्षा दिली असावी, असं त्यांनी म्हटलंय. अशा पद्धतीची भाषा राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री मंत्री, त्याचबरोबर संरक्षण मंत्री राहिलेल्या पवारांना शोभत नाही. त्यांच्याबाबत असलेला धोका लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांना हे संरक्षण दिलंय."


बगलबच्चे राजकारण करत आहेत :प्रसाद लाड पुढे म्हणाले, "तुम्ही आता विरोधात जरी असला तरी या राज्याचे नेते आहात. या राज्याचं देशाचं नेतृत्व तुम्ही करत आहात. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयानं तुम्हाला संरक्षण दिलं आहे. मला वाटतं तुमच्या पक्षातील बगलबच्चे याचं राजकारण करत आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं आरोप केले ते अयोग्य आहे. तुम्हाला जर संरक्षण नको असेल, तर तसं लेखी तुम्ही द्या. आपल्याला धोका असल्याचं केंद्रीय गृह विभाग, गुप्तचर विभागाला समजलं असेल. परंतु तुम्हाला जर वाटतं तुम्हाला संरक्षणाची गरज नाही, तसं लेखी पत्र केंद्रीय गृहमंत्र्याना दिलं तर तुमचं संरक्षण काढलं जाईल."

सुरक्षेवरून काय म्हणाले शरद पवार? :शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले की, "माझ्याकडे गृह खात्याचे अधिकारी आले. त्यांनी मला सांगितलं की देशातील तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. त्यावर मी त्यांना इतर दोन कोण आहेत? असं विचारलं. तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव सांगितलं. परंतु मला कशासाठी सुरक्षा पुरवली? हे माहीत नाही. कदाचित निवडणुका असल्याकारणानं मी सर्वत्र फिरतोय. त्या कारणानं योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था त्यांनी केली असावी. परंतु नक्की काय, हे मी सांगू शकत नाही. गृह विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो ठरविणार आहे."

हे वाचलंत का :

  1. शरद पवारांना केंद्राची Z+ सुरक्षा; नेमके कारण काय? - Sharad Pawar Z Plus Security
  2. महाराष्ट्र बंद बेकायदा असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन - Bombay high court News
  3. मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी दिले मोठे संकेत, सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा? - Sharad Pawar On CM Post

ABOUT THE AUTHOR

...view details