नवी दिल्ली : केंद्रातील नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. नितीन गडकरी यांना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रिपदी कायम ठेवले आहे. तर अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्याकडेही अनुक्रमे गृहमंत्री आणि संरक्षण खात्याची जबाबदारी कायम ठेवली आहे.
केंद्रातलं खातेवाटप जाहीर; अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरींसह इतरांची प्रमुख खाती कायम - Maharashtra Breaking News - MAHARASHTRA BREAKING NEWS
Published : Jun 10, 2024, 12:13 PM IST
|Updated : Jun 10, 2024, 7:35 PM IST
मुंबई Maharashtra Breaking News Live Update -आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. आनंदनगर जकात नाका, मुलुंड टोल नाका ते ऐरोलीपर्यंत वाहतूक कोंडीचा वाहनचालकांना सामना करावा लागत आहे. गेल्या दोन तासांपासून मुलुंड टोल नाका आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक विभागाकडून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहे.
LIVE FEED
अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरींसह इतरांची प्रमुख खाती कायम
वाढदिवसापूर्वी राज ठाकरेंच कार्यकर्त्यांना आवाहन
फक्त शुभेच्छा द्या. पुष्पगुच्छ, केक , मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येऊ नका.
वाढदिवसापूर्वी राज ठाकरेंच कार्यकर्त्यांना आवाहन.
तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी मोठी भेट
14 जून रोजी राज ठाकरेंचा असतो वाढदिवस
दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना शुभेच्या देण्यासाठी येत असतात.
पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर आणि नांदेडमध्ये पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याची माहिती आयएमडीचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली.
विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवू - संजय राऊत
मुंबई : विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवणार आहोत. तसंच मोदींचं बहुमत रोखण्यात आम्हाला यश मिळालं आहे. आता विधानसभेसाठी जोमानं कामाला लागलो आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. ठाकरे गटाच्या नेत्यांची शिवसेना भवनमध्ये आज बैठक झाली. त्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती तयार करण्यात आली.
खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई :राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. कोल्हापूरची जागा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे होती. पण त्यांनी ती काँग्रेससाठी सोडली. या ठिकाणी शाहू महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष आणि आनंद अजूनही कोल्हापुरात साजरा होत असताना, आज खासदार छत्रपती शाहू महाराजांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री इथे भेट घेतली.
खासदार कल्याण काळेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट
जालना : खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजबाबत काहीही बोललेले नाहीत. काही बोलले असतील तर ते खुलासा करतील, असे काळे म्हणाले. जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी आज अंतरवाली सराटी येथे येऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी काळे यांनी जरांगे यांनी उपोषणादरम्यान पाणी पिण्याची विनंती केली. तसेच त्याच्याशी चर्चा देखील केली.
कोस्टल रोडच्या कामाचे श्रेय घेण्याकरिता विरोधक पुढे आले होते-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विंटेज कारमधून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कोस्टल रोडची पाहणी केली. कोस्टल रोडच्या कामाचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलं होतं पण याचे श्रेय घेण्यासाठी विरोधक पुढे आले होते. महापालिका आणि एल अँड टी कंपनीनं अतिशय उत्कृष्ट कामं केलं. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला होईल. मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलं.
अभिनेत्री नूर मलाबिका दासचा मृतदेह घरात आढळला!
मुंबई- अभिनेत्री नूर मलाबिका दास हिचा मृतदेह तिच्या अंधेरी, ओशिवरा भागातील घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजारच्या लोकांनी केली असता पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतला.
जास्त कालावधीत नोकरी करणं हा नोकरीत कायम करण्याचा आधार होऊ शकत नाही- उच्च न्यायालय
केवळ जास्त कालावधी नोकरी करणं हा नोकरीत कायम करण्याचा आधार बनू शकत नाही. जास्त काळ नोकरी केल्यानं सेवेत नियमित करण्याची मागणी करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी एका प्रकरणाच्या निकालामध्ये नोंदवले.
दोन वर्षांपासून बीएमसीकडून बिल्डर आणि कंत्राटदारांसाठी राजवट-आदित्य ठाकरे
मुंबईला निवडून आलेल्या प्रतिनिधींसह (नगरसेवक) पूर्णवेळ सहायक आयुक्तांची गरज आहे. गेल्या 2 वर्षांपासून जनतेसाठी नव्हे तर भाजप-मिंधे राजवटीच्या आवडत्या बिल्डर आणि कंत्राटदारांसाठी चालविण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, मी हे वारंवार निदर्शनास आणून दिले आहे की, उत्तरदायित्व हे नागरिकांसाठी असते. मुख्यमंत्र्यांच्या बेकायदेशीर मित्रांसाठी उत्तरदायित्व नसते.
पुन्हा दुहेरी इंजिनचे सरकार आल्यानं गोव्याच्या कल्याणासाठी आणखी काम करू-प्रमोद सावंत
पणजी: उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद येसो नाईक यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्यानं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोदी सरकारचे आभार मानले. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, " गोव्यातील जनतेच्यावतीनं मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. तसंच मी श्रीपाद येसो नाईक यांचेही अभिनंदन करत आहे. पुन्हा दुहेरी इंजिनचे सरकार आल्यानं आम्ही आमच्या राज्याच्या कल्याणासाठी आणखी काम करू, अशी आशा करतो."
रियासी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर
रियासी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या झालेल्या यात्रेकरूंच्या नातेवाईकांना जम्मू काश्मीर सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. सरकारकडून जखमींना 50,000 रुपयांची तर मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमी यात्रेकरूंवर जम्मू आणि रियासीमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत: जम्मू आणि काश्मीरच्या उपराज्यपालांचे कार्यालय
शेतकऱ्यांची कर्जमाफी, कांदे आणि दुधाबाबत निर्णय अपेक्षित- सुप्रिया सुळे
पुणे- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाला माध्यमांशी संवाद साधला. खासदार सुळे म्हणाल्या, "मला आशा आहे की एनडीए या देशाला स्थिर सरकार देतील. मला वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांची कर्जमाफी, कांदे आणि दुधाबाबत निर्णय अपेक्षित आहे. कारण हे दोन्ही शेतकरी प्रचंड दबावाखाली आहेत. रियासी बसवरील दहशतवादी हल्ल्याची घटना खूप वेदनादायक आहे. "
उत्तर प्रदेशातील पोलीस असल्याचे दाखवून किराणा दुकानदाराची 18 लाखांची फसवणूक
ठाणे- लखनौ येथील पोलीस अधिकारी असल्याचं भासवून भामट्यानं ठाणे जिल्ह्यातील 66 वर्षीय किराणा दुकान मालकालाची 18 लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपीनं 9 मे ते 30 मे दरम्यान ठाण्यातील बदलापूर येथील किराणा दुकानदाराशी वेगवेगळ्या प्रसंगी संपर्क साधला.बदलापूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यानं सांगितलं की, लखनौच्या पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.
स्टॉक ट्रेडिंग फसवणुकीत ठाण्यातील व्यक्तीची ४०.७५ लाखांची फसवणूक, 4 जणांविरोधात गुन्हा
ठाणे- जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ठाण्याती एका व्यक्तीची 40.75 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनं खासगी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीशी यावर्षी मार्चपासून वेगवेगळ्या लोकांनी संपर्क साधून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य बनवले. त्यानंतर त्यांची फसवणूक करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा, शरद पवार यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन
पुणे- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या निवडणुकीनंतर राज्यात शरद पवार गटाची सत्ता येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. ते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेते उपस्थित राहिले.
मराठ्यांच्या हितसंबंधांना विरोध केल्याचा काँग्रेसला आगामी निवडणुकीत परिणाम भोगावा लागेल- मनोज जरांगे पाटील
जालना- मराठा आरक्षण आंदोलकाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटले, " काँग्रेस मराठा समाजाच्या हिताच्या विरोधात बोलत आहे. त्याचे परिणाम या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोगावे लागणार आहेत. आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील अंतरवली सराटी गावात माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरसकट मराठा आरक्षण देण्याची मागणी लावून धरली.