महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारावीच्या परीक्षेचा आज निकाल; कसा आणि कुठे पाहाल? - Maharashtra HSC 12th Result 2024 - MAHARASHTRA HSC 12TH RESULT 2024

HSC exam Results 2024 : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (21 मे) जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.

Maharashtra HSC Results
Maharashtra HSC Results (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 7:36 AM IST

Updated : May 21, 2024, 9:37 AM IST

मुंबई HSC exam Results 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (21 मे) जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता 12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळं मंडळातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकणार आहात. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जातील. 12 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कुठं आणि कसा पाहायला मिळणार हे आपण जाणून घेऊया.

ऑनलाईन निकाल कसा बघायचा?

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
  2. निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.
  3. संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.
  4. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी कशी आणि कधीपर्यंत करता येईल? :

  • निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकेची पडताळणी देखील करता येणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडं ऑनलाईन पध्दतीनं मागवता येतील. आपल्या गुणपत्रिकेची पडताळणी करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh-hsc.ac.in विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करता येईल, किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत देखील अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  • गुणपत्रिकेची पडताळणी करण्यासाठी आवश्यक अटी आणि सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे 2024 ते 5 जून 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीनं करता येईल. त्यासोबतच यासाठी लागणारे शुल्क ऑनलाईन पध्दतीनं Debit Card / Credit Card / UPI/ Net Banking द्वारे भरता येईल.

निकालाची उत्सुकता-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून 12 वी ची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकालाची वाट पाहत होते. त्यानंतर सोमवारी (20 मे) मंडळाकडून निकालाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे. आजच्या निकालात काय होणार?, याची उत्सुकता सर्वांना लागलीय.

हेही वाचा-

  1. उद्या दुपारी 1 वाजता लागणार एचएससी बोर्डाचा बारावीचा निकाल, वाचा कुठे पाहू शकता ऑनलाईन रिझल्ट... - HSC board 12th result
  2. कला शाखा निवडण्याचा माझा निर्णय फायद्याचा ठरला... छत्रपती संभाजीनगरच्या चैत्राची सीबीएसईत उत्तुंग भरारी - CBSE Board Result 2024
Last Updated : May 21, 2024, 9:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details