महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र दिन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली, म्हणाले 'महाराष्ट्रानं देशाला दिशा अन् विचार दिला' - Maharashtra Foundation Day - MAHARASHTRA FOUNDATION DAY

Maharashtra Foundation Day : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Maharashtra Foundation Day
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 8:58 AM IST

मुंबई Maharashtra Foundation Day :छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रानं विकासाची वाट धरली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं महाराष्ट्रानं 65 वर्षाचा टप्पा पूर्ण केला. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे. तीच संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली ठरेल, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. यावेळी मुंबईतील हुतात्मा चौकात त्यांनी महाराष्ट्र दिनामिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

राजकारण्यांची भाषा घसरली :"निवडणुका येतात जातात, मात्र पुरोगामी महाराष्ट्राला एक परंपरा आहे. राजकारणी काय करतात, मागं उरते. त्यामुळे आपली परंपरा खंडीत न होऊ देणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र राजकारण्यांची भाषा आता घसरली आहे. रोज शिव्याशाप देण्यात येत आहेत. विरोधकांकडून काही वेगळं ऐकायला येत नाही. विरोधकांकडे मुद्देच नसल्यानं अशाप्रकारची भाषा बोलली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रगती केली. त्यामुळे आम्हीही विरोधकांना आमच्या कामातून उत्तर देतो," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

कामगारांच्या कष्टानं मुंबई उभी राहिली :"घरी बसलेल्यांमुळे महाराष्ट्र मागं राहिला आहे. सोशल माध्यमावरुन राज्य चालवता येत नाही. ही मुंबई कामगारांच्या कष्टानं उबी राहिली आहे. त्यांच्या कष्टामुळेच आज महाराष्ट्र देशाच्या विकासात योगदान देत आहे. त्यामुळेच आमच्या सरकारनं मुंबईतील गिरणी कामगारांना घरं दिली आहेत. जिथं स्कोप असेल, तिथं घरं देणार," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं.

मुंबईतील सहा जागा जिंकणार :लोकसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपांचा तिढा अद्यापही सुटला नाही, याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडलं. यावेळी त्यांनी "ठाणे आणि नाशिकचा तिढा लवकरच सुटेल. मुंबईतील सहा जागा महायुती जिंकेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "आमच्या सरकारनं मुंबईला पाठबळ दिलं. बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना दिली. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जास्तीत जास्त सुरू केला," असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन एकाच दिवशी साजरा होण्याचा ऐतिहासिक योगायोग - May day
  2. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना उद्धव ठाकरेंकडून अभिवादन - Maharashtra Day

ABOUT THE AUTHOR

...view details