महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाय दूध उत्पादकाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान, गाव तिथे गोदाम योजना राबविण्यात येणार - Breaking News Today

Maharashtra Breaking news
Maharashtra Breaking news (Source- ETV Bharat Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 8:07 AM IST

Updated : Jun 28, 2024, 2:26 PM IST

'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

2:25 PM, 28 Jun 2024 (IST)

गाय दूध उत्पादकाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान, गाव तिथे गोदाम योजना राबविण्यात येणार

नुकसानीचे पंचनामे जलद होण्यासाठी ई पंचनामे प्रणाली राज्यात लागू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम उभारण्यात येणार आहे. प्रति हेक्टरी ५००० रुपये कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना मदत देणार येणार आहे. गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान दे्यात येणार आहे. कापसू आणि सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

2:07 PM, 28 Jun 2024 (IST)

पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मंडळ स्थापन करण्यात येणार-अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार हे दहव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, "तुकारामांच्या पालखीचे आज देहुतून प्रस्थान झाले. ज्ञानदेवांची पालखी उद्या निघणार आहे. प्रति दिंडी २० हजार रुपये देण्यात येणार आहे. निर्मल वारीसाठी ३६ कोटी वितरित करण्यात आले आहे. पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे."

1:53 PM, 28 Jun 2024 (IST)

लोकसभेत NEET च्या मुद्द्यावरून कामकाज दिवसभरासाठी तहकूब, रामदास आठवलेंची विरोधकांवर टीका

लोकसभेत NEET च्या मुद्द्यावरून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "मला वाटते NEET वर सभागृहात गदारोळ करण्याची गरज नाही. या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चौकशी स्थापन केली. जर त्यांना NEET वर चर्चा करायची असेल तर विरोधकांनी प्रथम अध्यक्षांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घ्यावा. परंतु विरोधक नियम टाळून NEET वर चर्चा करण्याची मागणी करत आहेत."

1:42 PM, 28 Jun 2024 (IST)

मुंबई ६० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज एनसीबीनं केले जप्त

मुंबई : मुंबईतील गजबलेल्या नागपाड्यासारख्या परिसरातून ६० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज एनसीबीनं जप्त केले. आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर टोळीचा पर्दाफाश झाल्याची माहिती एनसीबीचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी दिली आहे. नागपाड्यातून ३१.५० किलो एमडी जप्त करत एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. तसेच ६९ लाख रुपयांची रोकडदेखील जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

12:48 PM, 28 Jun 2024 (IST)

'नीट' रॅकेटच्या मास्टरमाइंडला अटक, उद्या पहाटेपर्यंत लातूरला आणण्यात येणार

'नीट' रॅकेटचे मास्टरमाइंड गंगाधर आणि इरान्ना कोंगुलवारच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना उद्या पहाटेपर्यंत लातूरला आणण्यात येणार आहे.

12:44 PM, 28 Jun 2024 (IST)

आशा भोसले यांच्या 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तकाचे प्रकाश, ९० लेखांसह दुर्मिळ छायाचित्रांचा आहे समावेश

महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या पुस्तक प्रकाशनचा खास सोहळा मुंबईत पार पडत आहे. 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकात पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांसह दुर्मिळ छायाचित्रांचे हे पुस्तक आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ही उपस्थितीत आहेत. त्यासोबतचं पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अशोक सराफ, सुरेश वाडकर, जॅकी श्रॉफ आदी मान्यवरांचा त्यात समावेश आहे.

12:01 PM, 28 Jun 2024 (IST)

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाकडून जामिन

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या खंडपीठानं सोरेन यांना जामिन दिला आहे. रांचीच्या बडगई भागात 8.86 एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा सोरेन यांच्यावर आरोप आहे. 31 जानेवारी रोजी ईडीनं माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली होती. तेव्हापासून ते रांचीच्या बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये आहत.

11:55 AM, 28 Jun 2024 (IST)

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विमान प्रवाशांवर गुन्हे दाखल

इंडिगोच्या वाराणसी-मुंबई फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या महिलेवर गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कण्यात आला. सीट बदलल्याच्या कारणावरून महिलेनं गैरवर्तन केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानाच्या शौचालयात धुम्रपान केल्याप्रकरणी एका 38 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. खलील काजम्मूल खान असे विमान प्रवाशाचे नाव आहे.

11:31 AM, 28 Jun 2024 (IST)

नीट परीक्षेच्या पेपरफुटीवर चर्चा करण्याकरिता विरोधकांचा गोंधळ, लोकसभेचे कामकाज स्थगित

नीट परीक्षेच्या पेपरफुटीवर चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही स्थगित करण्यात आले.

11:06 AM, 28 Jun 2024 (IST)

आज NEET च्या मुद्द्यावर चर्चा व्हावी-राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीटमधील घोटाळ्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला. राहुल गांधी म्हणाले, "शुक्रवारी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. आज NEET च्या मुद्द्यावर चर्चा होण्यावर सर्वांचे एकमत झाले. या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी पंतप्रधानांना विनंती करतो."

10:59 AM, 28 Jun 2024 (IST)

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आले आमने-सामने

महायुतीतील आमदारानी मोदींचे बॅनर झळकावत विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली. "एक अकेला मोदी सबसे भारी," "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा सत्ताधारी आमदारांनी घोषणा केल्या. तर विरोधकांनी दुध भुकटी निर्यातीच्या धोरणावरून पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

10:29 AM, 28 Jun 2024 (IST)

केंद्र सरकारनं आडमुठेपणा दाखविला तर विरोधक ताकद दाखवितील-संजय राऊत

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संसदेतील कामकाजावरून एनडीए सरकारवर टीका केली. खासदार राऊत म्ङणाले, " नीट घोटाळ्याप्रकरणी मोदी संसदेत बोलले नाहीत. पण आणीबाणीवर बोलले आहेत. ५० वर्षानंतर आणीबाणीचा विषय का काढला? केंद्र सरकार बहुमताच्या काठावर आहे. आडमुठेपणा दाखविला तर विरोधक ताकद दाखवितील. मोदींनी जिथे हात लावाल तिथे अशुभ आहे."

10:13 AM, 28 Jun 2024 (IST)

जिओनंतर एअरटेलकडून रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ

जिओनंतर एअरटेलनं रिचार्जचे प्लॅनचे दर वाढविले आहेत. एअरटेलचे नवे दर 3 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत.

8:49 AM, 28 Jun 2024 (IST)

नीटच्या पेपरफुटीचा बिहारमध्ये रचला कट, झारखडंमधील हजाराबाग सीबीआयच्या रडारवर

नवी दिल्ली- सीबीआयच्या तपासानुसार नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणात झारखंडमधील हजारीबाग हे मुख्य ठिकाण असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी असलेले सुमारे सहा परीक्षा केंद्रे आणि काही लोक सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआय टीमनं ओएसीएस शाळेचे मुख्याध्यापक आणि एनटीए शहर समन्वयक एहसान उल हक यांना ताब्यात घेतले. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेपर फुटीचा कट बिहारमध्ये रचला. तर हजारीबागमध्ये पेपर फुटी सर्वप्रथम करण्यात आली.

8:38 AM, 28 Jun 2024 (IST)

अमरनाथ यात्रा आजपासून सुरू होणार, श्रीनगरमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था

अमरनाथ यात्रा आजपासून सुरू होणार असल्यानं जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (NH-44) सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात दहशतवाद्यांचे जम्मू काश्मीरमधील हल्ले वाढत असल्यानं सुरक्षादल अलर्ट आहेत

7:54 AM, 28 Jun 2024 (IST)

दिल्लीत विमानतळाचे छत चारचाकी वाहनांवर कोसळले, सहा जण जखमी

नवी दिल्ली : राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 वर आज पहाटे मोठा अपघात झाला. विमानतळाच्या छताचा भाग अचानक कोसळल्यानं त्यामुळे तीन वाहने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. या अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

दिल्ली विमानतळ अपघातही बातमी या लिंकवर सविस्तर वाचा

Last Updated : Jun 28, 2024, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details