वरळी हिट अँड रन प्रकरण
BMW चा चालक बिडावतला करण्यात आलं कोर्टात हजर
चालकाच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
पोलीस करणार मिहिर शहा आणि बिडावत यांची समोरासमोर चौकशी
Published : Jul 9, 2024, 8:27 AM IST
|Updated : Jul 9, 2024, 5:50 PM IST
'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
LIVE FEED
वरळी हिट अँड रन प्रकरण
BMW चा चालक बिडावतला करण्यात आलं कोर्टात हजर
चालकाच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
पोलीस करणार मिहिर शहा आणि बिडावत यांची समोरासमोर चौकशी
वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मिहीर शाह हा घटनेनंतर फरार झाला होता. आज त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
विधान परिषद सभापतींची निवड करावी
महाविकास आघाडीच्या नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
गेल्या अडीच वर्षांपासून विधानपरिषद सभापतीचे पद रिक्त आहे
हे पद ताबडतोब भरावे अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली
मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा एका तरुणाचा प्रयत्न
सदर तरुणाला सुरक्षित खाली आणण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचा प्रयत्न
मुंबई - पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा सुरू आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात आंदोलन करत सरकारचा निषेध केला. तर जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत. यामधील एक जवान महाराष्ट्राचा आहे. देशावर अतिरेकी हल्ले होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र विदेशी दौरे करत आहेत. जे जवान शहीद झालेत त्याबदल समोर येऊन त्यांनी उत्तर दिले पाहिजे. जे जवान शहीद झाले त्याला जबाबडार केंद्र सरकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केली.
वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्क विभागानं जुहूतील बार सील केला आहे. आरोपी मिहिर शाह याने या बारमध्ये मद्यपान केल्याचा दावा करण्यात येत आहे.
प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेता भुवन बामचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या डीपफेक व्हिडिओमध्ये भुवन सट्टेबाजांमार्फत लोकांना टेनिसमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. बामनं आपल्या चाहत्यांना याबाबत सतर्क केले आहे. या प्रकरणात भुवननं ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
देशात हल्ले होत असताना पंतप्रधान विदेशी दौऱ्यावर आहे. जवान शहीद होत आहेत, हे सरकारचे अपयश आहे. मोदींनी समोर येवून याचे उत्तर दिले पाहिजे. सरकार खोटे बोलत आहे. अर्थसंकल्पात केवळ मोठ्या घोषणा केला आहेत, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून भास्कर जाधव विधानसभेत आक्रमक झालेत. विरोधी पक्ष नेते भाषण करत असताना मंत्र्यांची अनुपस्थिती अयोग्य आहे. सभागृहात बसून कोणी दखल घेत नसेल तर बोलण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. १० मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मला कुठेही गांभीर्य दिसत नाही, अशी खंतही विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर विदेशातील भारतीय समुदायासमोर माझे हे पहिलेच संभाषण आहे. 9 जुलैला तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन पूर्ण महिना झाला आहे. 3 पट अधिक ताकदीनं आणि 3 पट अधिक गतीनं काम करणार आहे." पंतप्रधान मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत.
कावेरी नाखवा यांना दीड किलोमीटर फरफटत नेल्यानंतर आरोपींनी त्यांना गाडीपासून बाजूला केलं होतं. त्यानंतर गाडी रिव्हर्स घेऊन गाडी रस्त्यावर पडलेल्या कावेरी नाखवा यांच्यावर चढवून आरोपी पसार झाले. या प्रकरणाचा सीसीटीव्हीतून सीसीटीव्हीत उलगडा झाल्याचा पोलिसांनी कोर्टात दावा केला. कावेरी नाखवा यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह, कार चालक राजऋषी बिडावत आणि राजेश शहा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्यात आला.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना क्लिनचीट दिल्यानं विरोधकांनी घोषणाबाजी केली. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून घेतलेले नेते, त्यांना क्लिनचीट मिळते, यांचा धिक्कार असे म्हणत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
एसआयटीने हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारला अहवाल सादर केला. यात भोलेबाबाच्या राजकीय संबंधांचे एसआयटीनं संकेत दिले आहेत. हाथरस दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले.
पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करत वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा लावल्यानं अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिले होते, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार, सर्व आमदार, मंत्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत. मुंबईतील मंत्रालाय समोरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातून बसने सर्वजण सिद्धिविनायक मंदिराकडे थोड्या वेळात होणारा रवाना होणार आहेत.
मुंबईत सोमवारी पावसानं दाणादाण केली. 10 तासांच्या कालावधीत मुंबईत सरासरी 47.93 मिमी पाऊस झाला. तर मुंबईच्या पूर्व 18.82 मिमी आणि पश्चिम भागात 31.74 मिमी पाऊस झाला. शहरात झाडे किंवा फांद्या पडण्याच्या 40 घटनांची नोंद झाली आहे. काही वाहनांचे नुकसान झाले आहे.
कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्यदलाचे पाच शूर जवान शहीद झाल्यामुळे खूप दुःख झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. आमच्या सैनिकांची दहशतवाद विरोधी मोहिम सुरू आहे."
नवी दिल्ली/मॉस्को- रशियन सैन्यासाठी लढणाऱ्या सर्व भारतीयांना सोडण्याचा आणि परत आणण्याचा रशियानं निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मॉस्को भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर आले आहेत.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार पावसाचे पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक पहाटे 4.30 वाजता सुरू करण्यात आला. मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकानुसार 2-3 मिनिटे उशिरा धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत. भारतीय हवामान विभागानं मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला. मुंबई विद्यापीठातील आज (9 जुलै 2024) होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखा लवकरच जाहीर होतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली.
मुंबई-गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्यानं मुंबईतील पवई तलाव सोमवारीपासून ओसंडून वाहू लागला. तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही आणि ते फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. भारतीय हवामान विभागानं आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि सातारा येथील शाळांना सुट्टी असणार आहे.