मुंबई Maharashtra Interim Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केले. अर्थसंकल्पात ९९ हजार २८८ कोटी रुपयांची वित्तीय तूट दर्शविण्यात आली.
Maharashtra Interim Budget 2024 Live Updates :
- बार्टीच्या धर्तीवर आर्टी ही संस्था उभारण्यात येणार आहे. ही संस्था असंघटित कामगार कल्याण महामंडळ म्हणून कार्यरत राहणार आहे.
- ३६ हजार नवे रोजगार अपेक्षित आहेत. कोकणातील ३२ किल्ल्यांच सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
- क्रीडा विभागासाठी ५३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर खेळाडुंच्या पारितोषिकाच्या रकमेत १० पटींनी वाढ केली आहे.
- पोलीस शिपाई पदाच्या १७ हजार ४७१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
- राज्याला ८ कोटींचा जीएसटी परतावा मिळाला आहे.
- अटल सेतू आणि कोस्टर रोड जोडण्यासाठी दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत.
- संभाजीनगरच्या विमानतळासाठी ५०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. नगरविकास खात्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- उद्योग विभागास १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- नवीन १० अतिरिक्त कुटुंब न्यायालये सुरू करण्यात येणार आहे.
- रत्नागिरी बंदरसाठी ३०० कोटीची तरतूद करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात शववाहिकी देण्यात येणार आहे.
- राज्यातील रेल्वे जाळ्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
- अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणी राज्य सरकारला मोक्याच्या ठिकाणी जागा मिळाल्या आहेत.
- पर्यटन विभागासाठी १ हजार ९७३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ५० पर्यटन स्थळांची निवड करून तेथे पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र ड्रोन मिशनला मान्यता मिळाली असून विभागीय ड्रोन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
- राज्यात नवीन २ हजार प्रमोद महाजन कौशल्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
- छत्रपती संभाजीराजे स्मारकाला २७५ कोटींचा निधी आहे.
- मिहानसाठी १०० कोटी रुपये
- नवी मुंबई विमानतळ मार्च २५ पर्यंत कार्यान्वित
- वस्त्रोद्योग धोरण जाहीर २०२३ - २८
- मोफत साडिवाटप सुरू
- निर्यात वाढीसाठी प्रयत्न
- २५ हजार उद्योग तयार करणार
- १ लख कोटी गुंतवणूक २० य
- हजार रोजगार
- हर घर नल, हर घर जल १ कोटी ४६ लाख नळजोडणी
- २८३१५ कोटींचे प्रस्ताव मंजूर
- पालघर जिल्ह्यात १४ लाख लोकांना सूर्या प्रकल्पातून पाणीपुरवठा
- २५ हजार किलोमीटर मार्गावर वृक्ष लावणार
- ४० टक्के ऊर्जा अपारंपारिक
- ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत
- मागेल त्याला सोर कृषी पंप
- वीज दर सावलतिस एक वर्ष मुदतवाढ
- सौर ऊर्जा कुंपण देणार
- ११३३४ कोटी ऊर्जा विभागास नियत्व्यय
- 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळी वर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे
- पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प आहे
- कुसुमाग्रज यांची कविता म्हणत अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली.
- मराठा समाजासाठी आम्ही सर्व सुविधा दिल्या आहेत. सरकारनं सर्व गोष्टी प्रामाणिकपणे केल्या. मी जरांगे पाटील यांच्याकडे दोनवेळा गेलो होते. हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. माझी आणि उपमुख्यमंत्री यांची जरांगे पाटील यांनी सर्वच काढली. फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले हे चुकीचं आहे. ही भाषा राजकीय आहे. यामागे कोण आहे हे शोधून काढणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- कोणावरही आंदोलन न करता मराठा समाजाला आरक्षण दिलंय. ज्यांना हे आरक्षण देण्याची संधी होती, त्यावेळी त्यांनी ते दिलं नाही. आता आमच्यावर आरक्षणावरुन टीका करत आहेत. कोणीही चॅलेंज केलं तरी हे आरक्षण टिकणारच आहे. त्याबाबत आम्ही न्यायालयात बाजू मांडणार आहोत - मुख्यमंत्री शिंदे
- मनोज जरांगे पाटील आंदोलनामुळं सत्ताधारी आणि विरोधक विधानसभा आणि विधानपरिषदेत भिडले.
- राजेश टोपे यांच्या कारखान्यावर कारस्थान शिजल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय.
- मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि आरोपांची आता SIT मार्फत चौकशी होणार आहे. याबाबतची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिली.
- मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागं कोण आहे याची आम्हाला माहिती आहे - फडणवीस
- मनोज जरांगे आंदोलनाची SIT चौकशी होणार
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागं कोण आहे? - देवेंद्र फडणवीस
- विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी - विजय वडेट्टीवार
- अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांचे आंदोलन.
मदतीची विरोधकांची मागणी : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी मदत जाहीर करून देखील अद्याप त्याचा लाभ मिळाला नाही. ही मदतही तत्काळ द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. चंद्रपूर, नाशिक, वर्धा, अकोला, यवतमाळ येथे अवकाळी पाऊस, गारपीठ मोठ्या प्रमाणात झाली आहे. द्राक्ष, संत्रा बाग, डाळिंब, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेली मदत अजूही देण्यात आली नाही. ही मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार केली. यानंतर सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले.