महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील 4,136 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान

राज्यातील २८८ मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार असल्यानं निवडणूक आयोगाकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.

Maharashtra Assembly election voting  live updates
विधानसभा निवडणूक मतदान अपडेट (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांवर आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाचा दिवस असल्यानं राज्यातील सर्व मतदारसंघातील मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाकडून पूर्वतयारी करण्यात आली आहे. राज्यातील संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. त्याचबरोबर इतर पक्ष, अपक्ष आणि राजकीय पक्षांचे बंडखोर नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.

Live updates

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळीच मतदान केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माध्यमांशी बोलताना म्हणाले "लोकशाहीत मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. प्रत्येकानं हे कर्तव्य बजावले पाहिजे. मी उत्तरांचलमध्ये होतो. पण मी मतदान करण्यासाठी काल रात्री परत आलो."
  • पुण्यातील कोथरूड मतदार संघात सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली आहे.
  • राज्यभरात मतदान प्रक्रियेला सुरुवात होत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) आणि एकूण मतदान प्रक्रिया सुरळीत चालण्याकरिता अमरावती, बारामती, कुलाबा, गोंदिया आणि नागपूर या प्रमुख ठिकाणी मॉक पॉल यशस्वीरित्या घेण्यात आले.

4,136 उमेदवार आहेत रिंगणात-राज्यातील 1,00,186 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. एकूण 1,00,186 मतदान केंद्रांपैकी 42,604 शहरी मतदान केंद्रे आणि 57,582 ग्रामीण मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाकडून दोन लाखांहून अधिक पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघाची निवडणूक असल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ नये, याकरिता पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 9.70 कोटी मतदार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 3,771 पुरुष, 363 महिला आणि इतर दोन असे एकूण 4,136 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

कशा आहेत राजकीय पक्षांच्या लढती?महायुतीत भाजपा 148 जागा लढवत आहे. तर शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 53 जागांवर निवडणूक लढवित आहे. काँग्रेस 103, शिवसेना (उबाठा) 89 जागांवर लढत आहे. तर राष्ट्रवादीचे (एसपी) 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षानं 237 उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार 128 जागांवर निवडणूक लढत आहेत. काँग्रेसची राज्यभरात किमान 75 जागांवर थेट भाजपाबरोबर, सुमारे 41 जागांवर राष्ट्रवादी (एसपी) विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. तर सुमारे 53 जागांवर शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.

हेही वाचा-

Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details