महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीत पाहा कोण दिग्गज उमेदवार झाले पराभूत... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. अनेक बड्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झालाय.

Maharashtra Assembly Election Results 2024 full list of losser candidates of 288 constituencies
विधानसभा निवडणूक पराभूत उमेदवारांची संपूर्ण यादी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 7:49 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Maharashtra Assembly Election Results 2024) स्पष्ट बहुमत मिळाल्याचं निकालातून समोर आलय. या निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 च्या आसपास जागा मिळत आहेत. त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे मोठे नेते पराभूत झालेत. तर बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पराभूत उमेदवारांच्या निकालांवर एक नजर टाकूयात.

क्रमतदारसंघपराभूत उमेदवारपक्ष
1संगमनेरबाळासाहेब थोरातकॉंग्रेस
2कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाणकॉंग्रेस
3माहीमअमित ठाकरेमनसे
4वांद्रे-पूर्वझिशान सिद्दिकीराष्ट्रवादी कॉंग्रेस
5तिवसायशोमती ठाकूरकॉंग्रेस
6वसईहितेंद्र ठाकूरबहुजन विकास आघाडी
7अचलपूरबच्चू कडूप्रहार जनशक्ती पक्ष
8कराड उत्तरबाळासाहेब पाटीलराष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी)
9सांगोलाशहजीबापू पाटीलशिवसेना
10ठाणे पाचपाखाडीकेदार दिघेशिवसेना (उबाठा)
11बारामती युगेंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी)
12जालना कैलाश गोरंट्याल कॉंग्रेस
13रिसोड भावना गवळी शिवसेना
14घनसावंगी राजेश टोपे राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी)
15वरळी मिलिंद देवरा शिवसेना
16औरंगाबाद पूर्व इम्तियाज जलील एआयएमआयएम
17रामटेक विशाल बरबटे शिवसेना (उबाठा)
18मानखुर्द शिवाजीनगर नवाब मलिक राष्ट्रवादी कॉंग्रेस
19आष्टी मेहबूब शेख राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी)
20शिवडी बाळा नांदगावकर मनसे


ही यादी पाहता यातील काहीजण मंत्रिपदावर राहिलेले नेते आहेत. पृथ्वीराच चव्हाण यांच्यासारखे नेते तर मुख्यमंत्रिपदावर राहिलेले आहेत. त्यांचाही पराभव झाल्याचं दिसतं. त्याचवेळी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून ज्या नेत्यांची नावं घेतली जात होती, त्यातील बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेतेही पराभूत झाले आहेत. एवढंच नाही तर अमित ठाकरे, युगेंद्र पवार यांच्यासारखे नव्या दमाचे मात्र प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्यानं यांची नावं चर्चेत होती. त्यांचाही पराभव झाला आहे.

नोट- ही यादी अपडेट होत आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर उमेदवार अधिकृतपणे विजयी झाल्याचे मानण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details