ETV Bharat / international

दक्षिण कोरियातील भीषण अपघातात 179 प्रवासी ठार; 2 महिलांवर उपचार सुरू - SOUTH KOREA PLANE CRASH

( South Korea Plane crash ) विमानतळावर विमान उतरताना दुर्घटना झाल्यानं 179 प्रवाशांचा मृत्यू झाला. दक्षिण कोरियात ही दुर्घटना घडली आहे.

South Korea Plane crash
दक्षिण कोरिया विमान दुर्घटना (Source- AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 18 hours ago

Updated : 14 hours ago

सेउल (दक्षिण कोरिया ) - दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर ( Muan International Airport ) मोठी दुर्घटना घडली आहे. बँकॉकमधून प्रवाशांना घेऊन आलेले विमान लँडिंग होताना अपघात झाला. यावेळी विमानाला लागलेल्या भीषण आगीत 179 प्रवाशांचा मृत्यू झाला.

धावपट्टीवरून जाऊन विमान भिंतीवर आदळल्यानंतर विमानानं पेट घेतला. दोन प्रवासी वगळता सर्व जण म्हणजे 179 प्रवासी ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. हा अपघात स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 वाजता घडला. अपघातात दोन महिला वाचल्या आहेत. त्यामध्ये एक प्रवासी आणि एक क्रू मेंबर आहे. त्यांच्यावर मोक्पो येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचे नेमके कारण काय?बँकॉकहून परतणाऱ्या विमानात सहा क्रू मेंबर्ससह एकूण 181 प्रवासी होते. दोन थायलंडचे नागरिक वगळता बहुतांश प्रवासी कोरियन नागरिक होते.स्थानिक टीव्ही स्थानकांद्वारे प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये विमान लँडिंग गियरवर उतरताना जमिनीवर घसरल्याचे दिसते. स्फोट होण्यापूर्वी विमान काँक्रीटच्या भिंतीवर आदळले. त्यानंतर भीषण आगीत संपूर्णपणे भस्मसात झाले. लँडिंग गियरमध्ये बिघाड आणि शक्यतो पक्ष्यांच्या धडकेमुळे हा विमान अपघात झाला असावा. नेमके कारण शोधण्यासाठी घटनास्थळी चौकशी सुरू आहे.

  • थायलंडचे पंतप्रधान, पेटोंगटार्न शिनावात्रा यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत पोस्टद्वारे अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला त्वरित मदत करण्याचे आदेश दिल्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे.

विमान अपघातामधील मृतांची संख्या वाढून 85 झाल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. दक्षिण कोरियातील हा आजपर्यंतचा सर्वात भीषण विमान अपघात आहे. मृतामध्ये 37 महिला आणि 25 पुरुष आहेत. नॅशनल फायर एजन्सीने सांगितलं की, विमानाची आग जवळजवळ आटोक्यात आली आहे. परंतु अधिकारी अजूनही जेजू एअर प्रवासी विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी 32 फायर ट्रक आणि अनेक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

दक्षिण कोरियाच्या आपत्कालीन कार्यालयाच्या माहितीनुसार विमानतळावरील आग विझवण्यात आली. दक्षिण कोरियाच्या मुआन शहरातील विमानतळावरील जेजू एअर पॅसेंजर विमानाला लँडिंग होताना अचानक आग लागली. या दुर्घटनेतील काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. हे विमान सुमारे 181 लोकांसह बँकॉकहून परतत होते. दक्षिण कोरियाच्या आपत्कालीन कार्यालय आणि स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंग गियरमध्ये बिघाड असल्यानं विमान धावपट्टीवरून घसरून कुंपणाला धडकले. त्यामुळे विमानतळावर रविवारी विमानाला आग लागली. स्थानिक टीव्ही माध्यमांनी विमान दुर्घटनेचे व्हिडिओ प्रसारित केले आहे. यात विमान लँडिंग होताना विमानाला भीषण आग लागल्याचं दिसून येते.

2000 नंतर जगभरातील सर्वात भीषण विमान अपघात

  • 9 ऑगस्ट 2024: ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यात विमान कोसळल्यानं 61 प्रवासी ठार झाले. हे विमान साओ पाउलोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ ग्वारुलहोसकडे जाताना विन्हेदोमध्ये कोसळले.
  • 24 जुलै 2024 : काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 जुलै रोजी सकाळी टेकऑफ दरम्यान 19 जणांसह एका खासगी विमान कंपनीचे विमान कोसळले. या अपघातात किमान 18 जणांचा मृत्यू झाला. सौर्य एअरलाइन्सचे विमान तांत्रिक कर्मचाऱ्यांसह 19 लोक घेऊन होते.
  • 15 जानेवारी 2023: नेपाळच्या पर्यटनासाठी 27 मिनिटांचे उड्डाण करणारे विमान 15 जानेवारी रोजी नव्याने सुरू झालेल्या विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात एका दरीत कोसळले, त्यात 72 पैकी किमान 68 जणांचा मृत्यू झाला.
  • 21 मार्च 2022 : 133 प्रवासी असलेले चायना ईस्टर्न एअरलाइन्सचे बोईंग 735 हे विमान गुआंगशी येथे कोसळले.
  • 10 जानेवारी 2020 : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांच्या माहितीनुसार इराणमध्ये युक्रेनियन प्रवासी असलेले विमान कोसळले. त्यात सर्व 176 जणांचा मृत्यू झाला.
  • 10 मार्च 2019 : इथिओपिया, एअरलाइन्सचे नवीन बोईंग 737-8 MAX हे अदिस अबाबा येथून टेकऑफ झाल्यानंतर लगेचच कोसळले. त्यातील सर्व 157 लोक ठार झाले. यामध्ये पाच संयुक्तराष्ट्रसंघाचे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 19 लोक होते.
  • 29 ऑक्टोबर 2018 : इंडोनेशियामध्ये लायन एअरचे एक विमान समुद्रात कोसळल्यानंतर त्यामधील सर्व 189 लोकांचा मृत्यू झाला आहे. जकार्ताहून सुमात्रा बेटावर उड्डाण केल्यानंतर अवघ्या 13 मिनिटांत हे विमान कोसळले.
  • 18 मे 2018 : क्युबामध्ये जोस मार्टी विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच राज्य एअरवेजचे विमान कोसळले. त्यातील 110 प्रवाशांपैकी तीन वगळता सर्वांचा मृत्यू झाला.
  • 11 एप्रिल 2018 : अल्जेरियामध्ये सैन्यदलाचे विमान अल्जियर्सच्या नैऋत्येकडील बौफारिक विमानतळाजवळील शेतात कोसळले. त्यात 257 प्रवासी ठार झाले.
  • 7 जून 2017 : 122 लोकांसह म्यानमारचे सैन्यदलाचे वाहतूक विमान दक्षिण म्यानमारहून यंगूनला जात असताना खाली कोसळले.
  • 8 मार्च 2014 : मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट हे क्वालालंपूरहून बीजिंगला जात असताना कोसळले
  • 1जून 2009 :- रिओ ते पॅरिस या प्रवासात सुमारे तीन तासांनंतर एअर फ्रान्सचे विमान 38,000 फूट उंचीवरून दक्षिणी अटलांटिक महासागराच्या खोलीत कोसळले. त्यातील सर्व 228 लोकांचा मृत्यू झाला.

हेही वाचा-

  1. कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचं विमान कोसळलं, अनेक जणांचा मृत्यू
  2. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन पायलट बेपत्ता - Plane crash in Jamshedpur

Last Updated : 14 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.