महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वकील संरक्षण कायदा करा, राहुरीतील खून प्रकरणी मुंबई बार असोसिएशन आक्रमक; आज काम बंद आंदोलन - मुंबई बार असोसिएशन आक्रमक

Lawyer Couple Murder Case : राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खून करण्यात आल्यानं राज्यभर खळबळ उडाली आहे. या खुनाचे पडसाद आज मुंबई सत्र न्यायालयातील कामकाजावर पडल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई सत्र न्यायालयातील बार असोसिएशननं आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. राज्यात वकील संरक्षण कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Lawyer Couple Murder Case
राहुरीत वकील दाम्पत्याचा खून

By PTI

Published : Feb 2, 2024, 7:56 AM IST

Updated : Feb 2, 2024, 9:38 AM IST

मुंबई Lawyer Couple Murder Case : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत वकील दाम्पत्याचा खून केल्याचे पडसाद मुंबई सत्र न्यायालयातील कामकाजावर पडले आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील वकील संघटनेनं या राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खुनाचा निषेध म्हणून आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे. वकिलांच्या संरक्षणासाठी 'वकील संरक्षण कायदा' महाराष्ट्रात लागू करण्यात यावा, अशी मागणी वकील संघटनेनं केली आहे.

वकील संघटनेनं पुकारलं काम बंद आंदोलन :अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथं वकील दाम्पत्याचा खून करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. त्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. मुंबई बार असोसिएशननं आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. आज मुंबई सत्र न्यायालयातील बार असोसिएशनचे वकील न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती बार असोसिएशननं पत्रक काढून दिली आहे. त्यामुळं आज न्यायालयातील कामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वकील संरक्षण कायदा करा :राज्यात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पती पत्नीवर झालेलला हल्ला हा त्याचाच एक भाग आहे. या वकील पती पत्नीचा मारेकऱ्यांनी खून केला आहे. त्यामुळं वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयातील बार असोसिएशननं एका पत्रकानुसार केल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात वकील दाम्पत्याचा खून :राहुरी तालुक्यातील मानोरी इथल्या राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी मनिषा आढाव यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार मारेकऱ्यांना अटक केलं आहे. आढाव दाम्पत्याचा खून केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. हा खून फिच्या वादातून झाल्याचं पुढं आलं आहे. राजाराम आढाव हे गुरुवारी दुपारपर्यंत राहुरीतील न्यायालयात होते. त्यानंतर ते दुपारी नगरला गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्नी मनिषा आढाव यांना अशिलाला पाठवून बोलावून घेतलं होतं. मात्र त्यानंतर ते दोघंही पती पत्नी बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळं बार असोसिएशननं वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

  1. अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला! वकिली करणाऱ्या पती-पत्नीचा निर्घृणपणे खून
  2. पत्नी समोरच पतीचा कोयत्यानं वार करुन निर्घृण खून; पोलिसांनी दोन संशयितांना घेतलं ताब्यात
Last Updated : Feb 2, 2024, 9:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details