ठाणेkalyan hoarding collapse :कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळं कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात लावण्यात आलेलं भलं मोठं होर्डिंग कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. तसंच या घटनेत अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी होर्डिंग कंपनीच्या मालकावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश डोळे, असं गुन्हा दाखल झालेल्या गुरु एंटरप्रायझेस कंपनीच्या मालकाचं नाव आहे.
डॉ.इंदू राणी जाखड, किरीट सोमैय्या यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) होर्डिंग कोसळ्यानं वाहतूक कोंडी :कल्याणच्या सहजानंद चौकात एक होर्डिंग गुरु एंटरप्रायझेस कंपनीनं लावलं होतं. सहजानंद चौक हा कल्याण शहरातील गजबजलेला चौक आहे. या चौकात गर्दीच्या वेळी होर्डिंग कोसळलं. त्यामुळं या अपघातात तीन जण जखमी झाले. सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेत वाहतूक कोंडी दूर केली. तसंच अग्निशमन दलाच्या पथकनं होर्डिंग रस्त्यावरून बाजूला काढलं. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
होर्डिंगवर प्रकणात जाहिरात कंपनीच्या मालकावर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणं ज्यांचं नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असल्याचं निश्चित केली जाईल. - डॉ.इंदू राणी जाखड, ठाणे महापालिका आयुक्त
प्रशासनाचा कानाडोळा? : गुरु एंटरप्रायझेस या जाहिरात कंपनीनं सहजानंद चौक परिसरात रस्त्याच्या चारी बाजूला भले मोठं-मोठे होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवरून वारंवार प्रश्न उपस्थित करूनही महापालिका प्रशासनानं त्याकडं कानाडोळा करत आहे. त्यामुळं आज ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सहजानंद चौकातील काझी हॉस्पिटल शेजारील 30 बाय 40 चं होर्डिंग अचानक कोसळलं. या दुर्घटनेत तीन नागरिक जखमी झाले. यात टू व्हीलर,रिक्षा, चारचाकी गाडीचं नुकसान झालंय. या परिसरात 900 पेक्षा अधिक बेकायदा होर्डिंग असल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला. तसंच अशा होर्डिंगवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
होर्डिंग कोसळल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी घटनास्थळाची पाहाणी केलीय. यावेळी बोलताना ते म्हणाले, "होर्डिंगच्या कंपनी मालकावर कारवाई न झाल्यास आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा."
घाटकोपर दुर्घटनेनंतर कारवाईचं नाटक :घाटकोपर येथील कल्याण होर्डिंग दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली पालिकेनं सुरुवातीला शासकीय आदेशानुसार मुख्य रहदारीच्या रस्त्यांवरून बेकायदा होर्डिंगचे लोखंडी सांगाडे हटवले होते. पहिले पंधरा दिवस हे पालिकेनं कारवाई केली. त्यानंतर अवैध होर्डिंग हटवण्याची मोहीम थंडावली. सहजानंद चौकातील होर्डिंग कोसळण्यास पालिकेचं दुर्लक्ष कारणीभूत असल्याची टीका नागरिक करत आहेत.
होर्डिंगला राजकीय नेत्यांचा आशीर्वाद? :कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बहुतांश होर्डिंग्ज ठाण्यातील काही राजकीय पक्षांच्या आशीर्वादानं अनेक वर्षांपासून लावण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या होर्डिंग्जवर कारवाई करू नये, अशी अलिखित सूचना वरिष्ठांना देण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणे आहे. त्यामुळं पालिकेचे अधिकारी माहिती असूनही अशा बेकायदा होर्डिंगवर कारवाई करत नसल्याचंही समोर आले. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देतात. त्यामुळं कनिष्ठ अधिकारी आदेशाचं पालन करून गप्प बसतात. त्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन होते की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासत नसल्याची माहिती आहे.
दरम्यान,मुंबईतील घाटकोपरमध्ये 14 मे रोजी मोठं होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत 74 जण जखमी झाले होते. त्यामुळं मुंबईतील अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पोस्टरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. 14 जणांच्या मृत्यूनंतर अनेक नेत्यांनी घटनास्थळाची पहाणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा होती. यासोबतच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले होते. त्यामुळं अशा घटना वारंवार घडत असताना जबाबदार कोण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
'हे' वाचलंत का :
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल - Ghatkopar Hoarding Accident
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित - Ghatkopar hoarding incident case
- मालाडमध्ये होर्डिंग कोसळल्यानं एक जण गंभीर, बिल्डरविरोधात गुन्हा दाखल - Mumbai Hoarding Collapsed