महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत हाय हाय गर्मी; गरज असेल तरच बाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन - Maharashtra Weather Update - MAHARASHTRA WEATHER UPDATE

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाची तीव्रता (Heat Increased) वाढली आहे. बहुतांश जिल्ह्यांत तपमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. मुंबईत उष्णता वाढली असून उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईचा पारा 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळं आपण बाहेर पडताना काय काळजी घ्यायला हवी जाणून घेऊयात तज्ज्ञांकडून.

Heat wave in Mumbai
मुंबईत उष्णतेची लाट

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 10:25 PM IST

मुंबई Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम मुंबईच्या हवामानावरही होणार आहे. त्यामुळं पुढील 3 ते 4 दिवस मुंबईच्या तापमानात वाढ (Heat Increased) होण्याची शक्यता भारतीय हवमानशास्त्र विभागाच्या कुलाबा विभागानं वर्तवली आहे. हे 4 दिवस मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हिटवेव्ह काळात अनेकांना उष्माघाताचा, त्वचेच्या आजारांच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते.



काय आहे हवामान विभागाचा अंदाज: भारतीय हवामान शास्त्र कुलाबा विभागाच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सुषमा नायर यांनी सांगितलं की, समुद्रसपाटीकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात प्रचंड प्रमाणात घट झाली होती. मात्र, राज्याच्या अन्य भागांमध्ये तुरळक पाऊस पडल्यानं त्याचा परिणाम मुंबईच्या हवामानावर झालेला दिसून येईल. आपण मागच्या दोन दिवसाचं तापमान पाहिलं तर आपल्या लक्षात येईल मुंबईच्या कमाल तापमानात 37 ते 38 अंशापर्यंत वाढ झालेली दिसून येते.



उष्माघात म्हणजे नेमकं काय :यासंदर्भात बोलताना राज्यपालांचे राजवैद्य डॉक्टर विनायक तायडे म्हणाले की, जेव्हा तुम्ही उन्हात काम करता त्यावेळी आपल्या शरीराचं तापमान वाढत जातं. बाहेरील तापमान आणि आपल्या शरीराचं तापमान याचा समतोल बिघडतो. अशावेळी आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्यातून जो त्रास होतो त्याला उष्माघात असं म्हणतात. याला वैद्यकीय भाषेमध्ये 'हिटस्ट्रोक' किंवा 'सनस्ट्रोक' देखील म्हटलं जातं. अति उष्णतेमुळं आपल्या शरीरात उष्णता निर्माण झाल्यानं पाण्याची आणि क्षारांची पातळी झपाट्याने कमी होते. याच्यानेच हिटस्ट्रोक येतो. अशावेळी योग्य वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. या घटनांचे प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक आहे.



उपाय काय : सर्वात पहिलं म्हणजे उष्माघात टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात भूक न लागणं, स्नायूंमध्ये गोळा येणं, चक्कर येणं, हात-पाय दुखणं, उच्च रक्तदाब, चक्कर येणं अशा समस्या उद्भवतात. लोकांनी उन्हाळ्यात हलके कपडे घालण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. उन्हाळ्यात अनेकदा डीहायड्रेशनच्या समस्या रुग्णांमध्ये दिसून येतात. हे टाळण्यासाठी शक्य तितके पाणी पिणे चांगलं. उन्हाळ्यात पोटाशी संबंधित आजार अधिक प्रमाणात होतात. त्यामुळं दही किंवा लिंबू पाण्याचं नियमित सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं आहे. याशिवाय टोपीचा आणि गॉगलचा वापर केल्यास उन्हाळ्यात होणारे पोट, डोळे, डोकेदुखी यांसारख्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो.

गरज असेल तरच घराबाहेर पडा : हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील सज्ज झाले आहे. पालिका प्रशासनानं 'गरज असेल तरच नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडावं' असं आवाहन मुंबईकरांना केलं आहे. लोकांनी घाबरून न जाता आपली काळजी घेऊन आपली दैनंदिन काम करावीत असं, महानगरपालिका प्रशासनाने म्हटलंय.

हेही वाचा -

  1. Maharashtra Weather Update : ऐन थंडीत 'ऑक्टोबर हिट'चे चटके; मुंबईसह राज्यात उकाडा वाढला
  2. Death Valley Visitors : Death Valley Visitors : उष्णतेच्या तीव्र झळीतही डेथ व्हॅलीत पर्यटकांचा ओढा कायम, जाणून घ्या या कुप्रसिद्ध वाळवंटात का येतात पर्यटक
  3. temperature increase : नवतपा वाढवणार नागरिकांचा ताप , विदर्भात पुढील 9 दिवस तापमानाचा पारा वाढणार

ABOUT THE AUTHOR

...view details