महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात सुरू झालं 'सतर्क हिरोज पार्क', शूरवीरांच्या न ऐकलेल्या कथा पाहायला मिळणार - Pune Satark Park - PUNE SATARK PARK

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर 'मिलिटरी इंटेलिजन्स' (MI) जवानांच्या सन्मानार्थ भारतीय लष्करानं पुण्यात 'सतर्क हिरोज पार्क' सुरू केलंय. या पार्कच शनिवारी उद्घाटन करण्यात आलं.

PUNE SATARK PARK
'सतर्क हिरोज पार्क'चं उद्घाटन (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 8:39 PM IST

Updated : Oct 5, 2024, 10:30 PM IST

पुणे : देशाची सेवा करताना प्राणाची आहुती देणाऱ्या 'मिलिटरी इंटेलिजन्स' (MI) जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट येथील वानवडी येथे वीरमरण आलेल्या 40 जवानांची आणि त्यांनी केलेल्या देशसेवाची माहिती देणारं देशातील पहिलं 'सतर्क हिरोज पार्क' बांधण्यात आलं. लेफ्टनंट जनरल प्रदीप कुमार चहल यांच्या हस्ते शनिवारी (5 ऑक्टोबर) या पार्कचं उद्घाटन करण्यात आलं.

भारतातील पहिलं सार्वजनिक स्मारक :'मिलिटरी इंटेलिजन्स' वीरांना समर्पित केलेलं भारतातील हे पहिलंच पार्क आहे. या पार्कमध्ये अनेक सन्मानित लष्करी गुप्तचर कर्मचाऱ्यांचे पुतळे आणि त्यांच्या योगदानाबद्दल माहिती देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना या पार्कमध्ये शूरवीरांच्या न ऐकलेल्या कथा पाहायला मिळणार आहेत.

बी.के. सिंग यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

पार्कमध्ये 40 शूरवीरांचे स्मारक :'रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड' (RSIIL) च्या सहकार्यानं 'मिलिटरी इंटेलिजेंस ट्रेनिंग स्कूल' आणि डेपो (MITSD) द्वारे हे पार्क बनवण्यात आलंय. या पार्कमध्ये कीर्ती चक्र पुरस्कार विजेते नाईक प्रताप सिंग (12 जून 1977) आणि ब्रिगेडियर रवी दत्त मेहता (7 जुलै 2008), शौर्य चक्र पुरस्कार विजेते शिपाई ओम शिव शर्मा (5 सप्टेंबर 1994), नाईक जंगबीर सिंग (12 जून 1977) या वीरांच्या प्रतिमा आहेत. पार्कमध्ये एकूण 40 शूरवीरांचे स्मारक बनवून त्यांच्या विषयी माहिती देण्यात आली. हे भारतातील पहिलंच असं पार्क आहे, जिथं मिलिटरी इंटेलिजन्स (MI) जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यात आलाय. या पार्कमध्ये 1962 पासून प्रामुख्यानं जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य सीमेवरील ऑपरेशनमध्ये वीरमरण आलेल्या 40 मिलिटरी इंटेलिजंन्सना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पार्क सर्वांसाठी खुलं असणार :रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेडचे संचालक बी.के. सिंग यांनी सांगितलं की, "ज्या जवानांना वीरमरण आलंय त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, याबाबत सातत्यानं विचार येत होते. वानवडी येथे एक खराब झालेलं पार्क होतं, तिथं 40 हुतात्मा जवानांचे पुतळे बनवून त्यांनी देशासाठी केलेलं कार्य हे जनतेपर्यंत आपण पोहचवू शकतो, असा विचार मनात आला. त्यानंतर अवघ्या 90 दिवसांत हे 'सतर्क हीरोज पार्क' बनविण्यात आलं. या पार्कसाठी एम.डी. अमित गाडोखे यांनी मोलाची मदत केली. 40 हुतात्मा जवानांचे पुतळे लखनौमध्ये बनवण्यात आले. हे पार्क सर्वांसाठी खुलं असणार असून येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या जवानांची माहिती मिळावी, हेच यामागचं उद्दिष्ट आहे."

हेही वाचा

  1. अमरावतीत पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड; बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Stone Pelting Amravati
  2. नागपुरात देशातील पहिला 'चार मजली उड्डाणपूल' सुरू; गडकरी म्हणाले, "वरदान ठरणार" - Nagpur Double Decker Flyover Bridge
  3. ठाण्यातील पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी आल्या रिकाम्या बस; पाहा व्हिडिओ - PM Narendra Modi
Last Updated : Oct 5, 2024, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details