महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर लोकसभा निवडणुकीत EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदान - राज्य निवडणूक आयुक्त - Lok Sabha elections

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं 400 पेक्षा अधिक अर्ज दाखल केल्यास EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावं लागेल, असं राज्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Lok Sabha elections
Lok Sabha elections

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 10:47 PM IST

मुंबई Lok Sabha elections: देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत, देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं देखील पत्रकार परिषद घेत निवडणुकीबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या निवडणूक मोहिमेवर राज्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांनी माहिती दिली.

बॅलेट पेपरवर मतदान? :राज्य निवडणूक आयुक्तांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. तर दुसरीकडं राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांना लोकसभा निवडणुकीत 5000 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असल्याचं बोललं जात आहे. जर लोकसभा निवडणुकीसाठी 400 पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले, तर निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या लागतील असं यावेळी राज्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांनी सांगितलं.

केंद्रिय निवडणूक आयोग निर्णय घेतील :पुढे बोलताना राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, राज्यात उमेदवारी अर्ज 400 पेक्षा अधिक आल्यास केंद्रीय निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेतील. मात्र, 400 पेक्षा कमी अर्ज आले, तर मतदान ईव्हीएम मशीनवर होईल. मात्र, 400 हून अधिक अर्ज आल्यास बॅलेट पेपरवर मतदान होईल. कारण यापूर्वीही निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतलेल्या आहेत. मात्र, याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, असं राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. बुकलेट मतपत्रिकेच्या माध्यमातून 400 पेक्षा अधिक उमेदवारांच्या नावांचा, चिन्हाच्या आधारावर मतदारांकडून शिक्का मारुन मतदान केलं जाऊ शकतं. त्यामुळं जर काही मतदारसंघातून उमेदवारांची संख्या वाढल्यास ईव्हीएम मशिनऐवजी त्याठिकाणी बुकलेट मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणूक होऊ शकतात.

ईव्हीएमची क्षमता किती? :लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी किती अर्ज दाखल केले?, महाराष्ट्रात ईव्हीएमवरमतदान होणार की, नाही याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, पण ईव्हीएम मशीनची काही क्षमता आहे. उमेदवारांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्यास बॅलेट पेपरवर मतदान करता येते. हे मी तांत्रिकदृष्ट्या सांगत असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

राज्यात कसं मतदान होणार? : पहिला टप्पा : 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा :26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा :7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा :13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा :20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ



हे वाचलंत का :

  1. Lok Sabha Elections : महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
  2. Assembly By Elections : लोकसभेबरोबरच 26 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक; महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश
  3. कशी होती स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक? वाचा भारतीय निवडणुकीचा प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details