ETV Bharat / state

महायुतीत सहभाग ते सरपंच हत्या प्रकरणावर बच्चू कडू उघडपणे स्पष्टच बोलले; पाहा EXCLUSIVE - BACCHU KADU EXCLUSIVE INTERVIEW

महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर बच्चू कडू काय करत आहेत? पुन्हा एकदा महायुतीसोबत जाणार का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे बच्चू कडू यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

BACHCHU KADU
ईटीव्ही भारतशी बोलताना बच्चू कडू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2025, 4:50 PM IST

Updated : Jan 30, 2025, 5:04 PM IST

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील मागितला जात आहे. तसंच राज्यात पुन्हा एकदा भाजपा आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. तर, दिव्यांग बांधवांचे सातत्यानं प्रश्न मांडणारे प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू सध्या काय करत आहेत? महायुतीमधून बाहेर पडल्यावर तिसरी आघाडी करणारे बच्चू कडू येणाऱ्या काळात महायुतीसोबत असणार का?.त्यांची राजकीय भूमिका काय असणार आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांच्याशी खास संवाद साधलाय .पाहूयात काय म्हणाले बच्चू कडू...

काही गोष्टी सांगता येत नाहीत : "काही गोष्टी सांगता येत नाहीत. आम्ही शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांसाठी काहीही करायला तयार आहोत. मी कधीच कोणत्याच युतीत जाणार नाही. राजकीय काही खेळ्या असतात. त्या कराव्या लागतात. त्यामुळं मला असं वाटतं की, शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, शेतमजूर आणि देशहितासाठी दिव्यांग बांधवांसाठी काम करत राहू आणि यांच्यासाठीच आमची युती कायम राहणार आहे," असं म्हणत बच्चू कडू यांनी युतीत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला.

ईटीव्ही भारतशी बोलताना बच्चू कडू (ETV Bharat Reporter)

मुख्यमंत्री फडणवीसांसोबत संपर्क नाही : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निवडणुकीच्या निकालानंतर काही बोलणं झालं नाही. ते सत्तेत असल्यामुळं त्यांनी संपर्क केला नाही आणि त्याची त्यांना गरजही नाही. मलाही त्यांच्यासोबत संपर्क करण्याची गरज वाटत नाही," असं बच्चू कडू म्हणाले.

संतोष देशमुख प्रकरण संशोधनाचा विषय : "सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी करणारे सत्तेतीलच आहेत. यातून काहीच स्पष्ट होत नाही. हा एक संशोधनाचा विषय आहे. विरोधकांनी मुद्दा उचलायचा असतो आणि सत्ताधाऱ्यांनी तो नाकारायचा असतो. पण या प्रकरणाचं एकंदरीत चित्र पाहिलं तर, इथं दोघेही सत्तेमधील लोक आहेत. अशा अवस्थेत त्या प्रकरणाचं राजकारण होतं की काय? असं वाटत आहे. सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. त्यापेक्षा आता या प्रकरणाला जे वळण येत आहे, ते पूर्ण रूप हे राजकीय आहे. टाळूवरचं लोणी खाणारी व्यवस्था सध्या राज्यात आहे," असं बच्चू कडू म्हणाले.

महाराष्ट्राचं रूपांतर बिहारमध्ये होऊ नये एवढीच अपेक्षा : "राज्यामध्ये कोणाच्या वेदनांचा काहीही संबंध राहिला नाही. प्रत्येक घटनेचं राजकारण करून त्यावर पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न होत आहे. एका चांगल्या राज्याचं रूपांतर बिहारमध्ये होऊ नये एवढीच अपेक्षा आहे," असंही बच्चू कडू म्हणाले.

लाडकी बहीण योजना मतांसाठीच : "लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला द्यायचा या पेक्षा तुम्हाला मतं घ्यायची होती, एवढाच या योजनेमागचा उद्देश होता. कोणाची चूल पेटावी आणि आनंदानं जगावं यासाठी ही योजना नक्कीच नव्हती. ती मतांसाठीच होती आणि यातून तेच साध्य होणार आहे," असं म्हणत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱयांवर जोरदार टीका केली.

हेही वाचा :

  1. मुंबईत लवकरच बाईक टॅक्सी सेवा, महिला सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना
  2. "कुंभ मेळ्यातील ९ हजार कोटी कुणाच्या खिशात गेले?" संजय राऊतांचा सवाल
  3. पुण्यात जीबीएसचे १२७ रुग्ण, दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क

Last Updated : Jan 30, 2025, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.