मुंबई Bank Manager Cyber Crime : बीकेसी पोलिसांनी एका सायबर भामट्याचा शोध सुरू केला आहे. या सायबर गुन्हेगाराने एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून 7.95 लाख लंपास केले आहेत. संचालकाच्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे भासवून संचालकाला अचानक रुग्णालयात दाखल केल्याचे सांगून या भामट्याने ICICI बँकेच्या बीकेसीच्या शाखा व्यवस्थापकाची फसवणूक केली. फसवणूक करणाऱ्याने बँक व्यवस्थापकाच्या फोनवर संचालकांच्या स्वाक्षरी असलेले लेटरहेड पाठवले.
आजारपणाची परिस्थिती खरी असल्याचे मानून बँक व्यवस्थापकाने फसवणुकीचा संशय न घेता पैसे हस्तांतरित केले. बँक व्यवस्थापकाला हा सायबर फ्रॉड लक्षात आला तेव्हा त्याने व्यवहार थांबवण्याचा प्रयत्न करेपर्यंत फैजाबादमधील एका खातेदाराने पैसे आधीच काढले होते. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षा चालकाविरोधात भारतीय दंड संविधान कलम ४१९, ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६क, ६६ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी दिली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? : बीकेसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास पटेल (वय 39) हे आयसीआयसीआय बँकेचे बीकेसी शाखेचे व्यवस्थापक असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत 13 मे रोजी दुपारी त्यांना कोणीतरी फोन आला की, Galaxy Diamond Pvt Ltd चा कर्मचारी सदस्य असल्याची खोटी माहिती देऊन कॉलरने तातडीने निधी हस्तांतरित करण्याची विनंती केली. Galaxy Diamond Pvt Ltd कंपनीचा संचालक चिरागकुमार संघवी यांना हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीसाठी दाखल करण्याकरिता पैशांची गरज आहे. कॉलरने व्हॉट्सॲपद्वारे विनंती पत्रही पाठवले.